Join us  

लॉकडाऊनमुळे भारतात अडकले न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक; शिकतायत हिंदी अन् कन्नड 

लॉकडाऊनमुळे सामान्यांप्रमाणे क्रिकेटपटूंनाही घरीच रहावे लागत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 5:12 PM

Open in App

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सामान्यांप्रमाणे क्रिकेटपटूंनाही घरीच रहावे लागत आहे. या लॉकडाऊनमुळे न्यूझीलंड संघाचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांना भारतातच अडकून रहावे लागले आहे. 29 मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगसाठी ( आयपीएल 2020) हेसन भारतात आले होते. पण, ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. हेसन हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे डायरेक्टर आहेत.

Video : घरी बसून 'हिटमॅन'ला काय काय करावं लागतंय? इंग्लंडच्या खेळाडूला सांगितली व्यथा

बंगळुरूमध्ये अडकून राहिलेले हेसन यांनी स्पोर्ट्सस्टारला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,''मी आता भारतीय भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही जेव्हा आयुष्यात गुरफटून जाता, तेव्हा थोडा स्वतःसाठी वेळ काढावा. मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत आहे आणि येथील स्थानिक भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहे. परदेशात असता तेव्हा तुम्हाला तेथील भाषा समजण्याचा आणि शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. मी हिंदी शिकत आहे आणि थोडीफार कन्नडही. ही आव्हानात्मक भाषा आहे, परंतु मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.''

कोरोना व्हायरसमुळे आयपीएल रद्द होण्याची चर्चा आहे. तरीही हेसन आगमी सत्रासाठी प्लानींग करत आहेत. ते म्हणाले,''RCB कडून माझी सर्व काळजी घेतली जात आहे. मी काम सुरूच ठेवले आहे. मी काही जुने व्हिडीओ पाहत आहे आणि नोट्स तयार करत आहे. त्यातून पुढील सत्राची रणनीती आखली जाऊ शकते. शिवाय मी जेवणंही बनवायचा प्रयत्न करत आहे.''  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Salute : आफ्रिदीनंतर बांगलादेशच्या कर्णधारानं घेतली 300 गरीब कुटुंबांची जबाबदारी

Video : कोरोना व्हायरसमुळे भयभीत आहात? DJ Bravoचं नवं प्रेरणादायी गाणं ऐका

Video : क्वारंटाईनमध्ये विराट-अनुष्का काय करतायत ते पाहा!

Corona Virus : 21 वर्षीय टेनिसपटूची समाजसेवा; गरजूंना वाटतेय जीवनावश्यक वस्तू

India Vs Corona: 10 श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी 'या' सहा जणांनी अजूनही दाखवलेली नाही मनाची श्रीमंती

MS Dhoni चा निवृत्तीचा निर्णय झाला पक्का, लवकरच घोषणा 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यारॉयल चॅलेंजर्स बेंगलोरन्यूझीलंड