Join us  

९ दिवसांच्या विश्रांतीनंतर फक्त २३ षटकं टाकणे दमवणारे नक्कीच नव्हते, मग...

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. पाचवी व शेवटची कसोटी ७ मार्चपासून धर्मशाला येथे सुरू होणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 12:53 PM

Open in App

India vs England 5th Test ( Marathi News ) - भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. पाचवी व शेवटची कसोटी ७ मार्चपासून धर्मशाला येथे सुरू होणार आहे आणि हा कसोटीत इंग्लंडला हलक्यात घेऊ नका, असा सल्ला महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी दिली आहे. पण, याचवेळी त्यांनी रांची येथे झालेल्या कसोटीत जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.  

विराट कोहली आणि लोकेश राहुल हे प्रमुख खेळाडू आधीच संघाबाहेर असताना बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने रांची कसोटी जिंकून मालिका खिशात टाकली. या सामन्यात आकाश दीपला पदार्पणाची संधी दिली गेली आणि २७ वर्षीय खेलाडूने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात बेन डकेट, झॅक क्रॉली व ऑली पोप या प्रमुख ३ विकेट्स घेऊन प्रभाव पाडला. गावस्करांनी आकाश दीपचे कौतुक केले. ''राजकोट येथील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात फक्त १५ षटके टाकली आणि  दुसऱ्या डावात आठ षटके टाकली तरीही बुमराहला कदाचित प्रशिक्षकाच्या सूचनेनुसार रांचीला विश्रांती देण्यात आली,” असे गावस्कर यांनी नमूद केले.

“दुसरा कसोटी सामना आणि तिसरा कसोटी सामना यामध्ये नऊ दिवसांचा ब्रेक होता हे विसरू नका आणि त्यानंतर संपूर्ण सामन्यात २३ षटके टाकणे अजिबात थकवणारे नाही, मग बुमराहला विश्रांती का देण्यात आली? चौथ्या कसोटीनंतर अंतिम कसोटी सामन्यापूर्वी आणखी आठ दिवसांचा ब्रेक मिळणार होता; अत्यंत तंदुरुस्त खेळाडूंना बरे होण्यासाठी आणि देशासाठी खेळण्यासाठी तयार होण्यासाठी हा पुरेसा वेळ आहे,” असे माजी भारतीय कर्णधार म्हणाले.  

“चौथी कसोटी देखील महत्त्वपूर्ण खेळ होती कारण, जर इंग्लंडने ती जिंकली असती तर अंतिम कसोटी निर्णायक ठरली असती. त्यामुळे, बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय संघाच्या हिताचा नव्हता. आकाश दीपने शानदार गोलंदाजी करून बुमराहची अनुपस्थिती भरून काढली, पुन्हा एकदा दाखवून दिले की मोठी नावे खेळली नाहीत तरी काही फरक पडत नाही,” असेही गावस्कर पुढे म्हणाले. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजसप्रित बुमराहसुनील गावसकर