Join us  

Suresh Raina ‘Sports Icon’ : CSK चा माजी खेळाडू सुरेश रैनाचा मालदीव सरकारकडून ‘Sports Icon’ पुरस्काराने गौरव!

Maldives Sports Awards 2022: भारताचा माजी क्रिकेटपटू  सुरेश रैना ( Suresh Raina) याचा मालदीव सरकारकडून विशेष गौरव करण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 10:14 AM

Open in App

Maldives Sports Awards 2022: भारताचा माजी क्रिकेटपटू  सुरेश रैना ( Suresh Raina) याचा मालदीव सरकारकडून विशेष गौरव करण्यात आला. मालदीप क्रीडा पुरस्कार 2022 सोहळ्यात CSK चा माजी उप कर्णधार सुरेश रैना याला  ‘Sports Icon’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कारासाठी रैनासह 16 आंतरराष्ट्रीय खेळाडूंना नामांकन देण्यात आली होती. यामध्ये रिअल माद्रिदची माजी खेळाड रोबेर्टो कार्लोस, जमैकन धावपटू असाफा पॉवेल, श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या व डच फुटबॉलपटू एडगर डेव्हिड्स यांचा समावेश होता. 

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात सुरेश रैना खेळाडूच्या भूमिकेत दिसणार नाही. Mr. IPL सुरेश रैनाला आयपीएल २०२२साठी झालेल्या लिलावात कोणीच वाली मिळाला नाही. चेन्नई सुपर किंग्सनेही त्याच्याकडे पाठ फिरवली. सुरेश रैनाला २०२१च्या आयपीएलमध्ये साजेशी कामगिरीही करता आली नाही. रैनाने १२ सामन्यांत १६० धावाच केल्या होत्या. एकूण आयपीएलमध्ये २०५ सामन्यांत ३२.५१च्या सरासरीने ५५२८ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याने २५ विकेट्सही घेतल्या आहेत. रैनाने ५०६ चौकार व २०३ षटकार खेचले आहेत आणि १०८ झेलही टिपले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रैना चौथ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली ( ६२८३), रोहित शर्मा ( ५७८४) व शिखर धवन (५६११) हे आघाडीवर आहेत.   

सुरेश रैना आयपीएलमध्ये दिसणार नव्या भूमिकेत! 

चेन्नई सुपर किंग्सचा माजी उप कर्णधार आयपीएल २०२२त समालोचकाच्या भूमिकेत पदार्पण करणार आहे. यावेळी तो भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत क्रिकेट सामन्यांचे हिंदीत समालोचन करणार आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसैन सध्या न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत समालोचन करत असल्याने ते आयपीएलमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार नाही. पण, केव्हीन पीटरसन, मार्क निकोलस, इयान बिशॉप, डॅनी मॉरिसन, सिमोन डॉल, मिचेल स्लॅटर हे समालोचन करताना दिसतील.हिंदी समालोचक - आकाश चोप्रा, इरफान पठाण, गौतम गंभीर,  पार्थिव पटेल, निखिल चोप्रा, तान्या पुरोहित, किरण मोरे, जतिन सप्रू, सुरेश सुंदरम, रवी शास्त्री व सुरेश रैना 

टॅग्स :सुरेश रैनामालदीव
Open in App