Join us  

भारताच्या माजी क्रिकेटपटूने ख्रिस गेलची केली ब्रॅडमनसोबत तुलना

गेल याने टी २० मध्ये राजस्थान विरोधातील सामन्यात १००० वा षटकार ठोकला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 2:34 PM

Open in App

भारताचा माजी सलामीवीर आणि स्फोटक फलंदाज असलेल्या विरेंद्र सेहवाग याने ख्रिस गेल याची तुलना महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्यासोबत केली आहे. सेहवागने ट्विट केले की, टी२० चा ब्रॅडमन ख्रिस गेल हा टी २० क्रिकेटच्या महान खेळाडूंपैकी एक आहे. ’

गेल याने टी २० मध्ये राजस्थान विरोधातील सामन्यात १००० वा षटकार ठोकला आहे. त्याची टी २० क्रिकेटमधील कामगिरी अफलातून आहे. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर त्याने संघाला कायमच विजय मिळवून दिला. त्याने आतापर्यंत जगभरातील विविध टी२० क्रिकेट लीग आणि आंतरराष्ट्रीय सामने पाहता त्याच्या कामगिरीची तुलना सेहवागने ब्रॅडमन यांच्या कामगिरीसोबत केली आहे.

गेल याने आतापर्यंत टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात १०५ षटकार तर आयीएलमध्ये ३४९ षटकार लगावले आहेत. त्याने आयपीएलमध्ये खेळताना टी२० मध्ये सर्वाधिक १७५ धावांची खेळी केली आहे. गेल याने आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर, रॉयलचँलेजर बंगलुरू या संघांकडून खेळ केला आहे. त्या शिवाय तो बांगलादेश प्रीमियर लीग, बिग बॅशलीग,  कॅरेबियन प्रीमियर लीग यासारख्या विविधलीगमधून खेळ करतो.

टॅग्स :ख्रिस गेलविरेंद्र सेहवाग