Join us  

शहीद जवानांच्या कुटुंबियांना मोहम्मद शमीकडून पाच लाखांची मदत

जवानांना जेव्हा जेव्हा आमची मदत लागेल तेव्हा आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहू, असे शमीने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 7:35 PM

Open in App

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पुलवामा येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. या 40 शहीद जवानांच्या कुटुंबियांना शमीने मदत करण्याचे ठरवले आहे.

याबाबत शमी म्हणाला की, " आम्ही मैदानात देशाचे प्रतिनिधीत्व करतो. पण जवानांमुळे आम्ही सुरक्षित आहोत. त्यामुळे त्यांना जेव्हा जेव्हा आमची मदत लागेल तेव्हा आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहू. "

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यांना सडेतोड उत्तर द्या, असा सूर देशभरात उमटत आहे. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले आणि त्यानंतर पाकिस्तानशी सर्व संबंध तोडण्याचे कार्य सुरू झाले. देशवासीयांप्रमाणे सेलेब्रिटीनींही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आगामी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.

यापुढे शंभर शहीद जवानांच्या मुलांना मदत करणार - गौतम गंभीरभारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला आर्मीमध्ये जाता आले नाही, याचा आता पश्चाताप होत आहे. पण आर्मीमध्ये जाता आले नसले तरी शहीद जवानांच्या मुलांसाठी गंभीर आपल्या एनजीओच्या माध्यमातून कार्य करत आहे. गंभीरने जवानांच्या 50 मुलांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली होती. आता यापुढे शंभर जवानांच्या मुलांना मदत करत असल्याचे गंभीरने सांगितले. आर्मीमध्ये जाण्याबद्दल गंभीर म्हणाला की, " क्रिकेट हे माझे पहिले प्रेम कधीच नव्हते. मला आर्मीमध्ये जायचे होते. पण बारावीमध्ये असताना मी दिल्लीकडून रणजी क्रिकेट स्पर्धा खेळलो. माझी कामगिरी चांगली होत गेली. त्यामुळे मी क्रिकेटवर अधिक लक्ष दिले. " 

जवानांच्या मुलांना सेहवाग करणार शिक्षणासाठी मदतया शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी भारताचा माजी तडफदार फलंदाज वीरेंद्र सेहवाग पुढे आला आहे. या शहीद जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलण्याबाबत सेगवागने एक ट्विट केले आहे. सेहवागने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " शहीद जवानांसाठी आपण जेवढे करू तेवढे कमीच आहे. पण शहीद झालेले जे जवान आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी मात्र आपण घेऊ शकतो. सेहवाग आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये जर शहीद जवांनाच्या मुलांनी प्रवेश घेतला तर ते माझे सौभाग्य असेल. "

टॅग्स :पुलवामा दहशतवादी हल्लामोहम्मद शामी