Join us

RCB vs DC Latest News : विराट कोहलीला बाद करण्यासाठी आर अश्विननं टाकले १२५ चेंडू; नोंदवला नकोसा विक्रम!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात आतापर्यंत मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) हा एकमेव संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला आहे. MIनं १८ गुणांसह अव्वल स्थान पक्कं केलं आहे. चेन्नई सुपर किंग्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांचे आव्हान संपुष्टात आले आहेत.

By स्वदेश घाणेकर | Updated: November 2, 2020 20:37 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात आतापर्यंत मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) हा एकमेव संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला आहे. MIनं १८ गुणांसह अव्वल स्थान पक्कं केलं आहे. चेन्नई सुपर किंग्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांचे आव्हान संपुष्टात आले आहेत. आता उर्वरित तीन जागांचा निर्णय आजच्या आणि उद्याच्या लढतीनंतर होईल. पण, उर्वरित दोन सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स वगळता अन्य तीन संघांना एखादी चूक महागात पडू शकते. त्यात आज दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals ) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातल्या सामन्यातील विजेता प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का करेल.  

- दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण करणार- अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल व डॅनिएल सॅम यांचे पुनरागमन- RCBच्या संघात शिवम दुबे व शाहबाज अहमद यांना संधी- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - देवदत्त पडीक्कल, जोश फिलिफ, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, इसुरू उदाना, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल- दिल्ली कॅपिटल्स - अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, डॅनिएल सॅम, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, कागिसो रबाडा, आर अश्विन, अॅऩरिच नॉर्ट्झे, रिषभ पंत  

जोश फिलिफ आणि देवदत्त पडीक्कल यांनी RCBच्या डावाची सुरुवात केली. कागिसो रबाडानं पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर फिलिफ ( १२) माघारी पाठवले. त्यानंतर विराट कोहली व पडीक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. आर अश्विननं ही भागीदारी संपुष्टात आणताना कोहलीला ( २९) माघारी पाठवले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २०व्या डावात आर अश्विननं प्रथमच विराटला बाद केलं. RCBच्या कर्णधाराला बाद करण्यासाठी अश्विनला १२५व्या चेंडूची वाट पाहावी लागली.

 

टॅग्स :IPL 2020आर अश्विनविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्स