Join us  

पहिली कसोटी : श्रीलंकेच्या फिरकीपटूंचे १८ बळी! वेस्ट इंडिजवर १८७ धावांनी मात

लंकेने विंडीजला विजयासाठी ३४८ धावांचे लक्ष्य दिले होते. विंडीजचा दुसरा डाव १६० धावांत संपुष्टात आला. मालिकेतील दुसरा सामना याच मैदानावर २९ नोव्हेंबरपासून सुरू होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 9:15 AM

Open in App

गाले : श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी सामन्यात १८ गडी बाद केल्यामुळे दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजला पहिल्या सामन्यात पाचव्या आणि अखेरच्या दिवशी गुरुवारी १८७ धावांनी पराभवाचे तोंड पहावे लागले.  दोन्ही डावांत फलंदाजीत शानदार कामगिरी करणारा यजमान कर्णधार दिमुथ करुणारत्ने सामन्याचा मानकरी ठरला. त्याने १४७ आणि ८३ धावा केल्या होत्या. लंकेने विंडीजला विजयासाठी ३४८ धावांचे लक्ष्य दिले होते. विंडीजचा दुसरा डाव १६० धावांत संपुष्टात आला. मालिकेतील दुसरा सामना याच मैदानावर २९ नोव्हेंबरपासून सुरू होईल. लंकेने पहिल्या डावात ३८६ धावा उभारल्या होत्या. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात केवळ २३० धावा केल्या. लंकेचे फिरकीपटू प्रवीण जयविक्रमाने चार आणि रमेश मंडिसने तीन गडी बाद केले.   लंकेने दुसरा डाव ४ बाद १९१ धावांवर घोषित केला. त्यामुळे विंडीजला ३४८ धावांचे लक्ष्य मिळाले होते. बोनेरने लंकेचा विजय लांबवला. त्याने २२० चेंडूंत सात चौकारांसह सर्वाधिक ६८ तसेच जोशुआ डिसिल्व्हा याने ५४ धावांचे योगदान दिले. दोघांनी सातव्या गड्यासाठी शंभर धावा केल्या. विंडीजच्या दोन्ही डावांत २० पैकी १८ फलंदाज फिरकीच्या जाळ्यात अडकले. रमेश मेंडिसने सात, प्रवीण जयविक्रमाने ५ आणि डावखुरा फरकी गोलंदाज लसिथ एंबुलदेनियाने सहा गडी टिपले.

युवा खेळाडूंनी अनुभवाचा लाभ घ्यावा!‘ युवा खेळाडूंनी धावा काढण्यासाठी अनुभवी खेळाडूंकडून टिप्स घ्याव्यात. आमच्याकडे मॅथ्यूज आणि चांदीमलसारखे अनुभवी खेळाडू आहेत. फिरकी गोलंदाजांनी आमचा विजय सोपा केला. वेगवान गोलंदाजांना अधिक षटके टाकण्याची संधी मिळाली नाही. मागील काही महिन्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे खेळपट्टी कशी असेल, हे कोडे होते. त्यामुळे केवळ दोन वेगवान गोलंदाज खेळविले. पुढच्या सामन्यात अधिक युवा खेळाडूंना संधी दिली जाईल.’- दुमिथ करुणारत्ने, कर्णधार श्रीलंका  

 

टॅग्स :श्रीलंकावेस्ट इंडिज
Open in App