Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत विजयाने सुरुवात करणार, आज पहिला टी-२0 सामना

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या प्रदीर्घ दौऱ्याची सुरुवात उद्या येथे आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजयाने करण्याच्या निर्धाराने करील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 05:32 IST

Open in App

डब्लिन : भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या प्रदीर्घ दौऱ्याची सुरुवात उद्या येथे आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजयाने करण्याच्या निर्धाराने करील.या सामन्याद्वारे भारतीय संघ इंग्लंड दौºयाचीदेखील तयारी करील. आयर्लंडच्या छोट्या मालिकेनंतर भारत इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. सध्या इंग्लंडचा संघ जबरदस्त कामगिरी करीत असून, त्यांनी एकदिवसीय मालिकेत आॅस्ट्रेलियाचा ५-० असा सफाया केला. त्यांचे जवळपास सर्वच खेळाडू चांगल्या लयीत आहेत.इंग्लंडला कडवी झुंज देण्यासाठी भारतीय संघ आयर्लंडविरुद्धच्या सामन्याच्या तयारीसाठी लंडनमध्ये थांबला होता. संघाने शनिवारी येथे पोहोचल्यानंतर मर्चंटस् स्कूल क्रिकेट मैदानावर सराव सत्रात सहभाग घेतला. संघाच्या सूत्रांनुसार सरावादरम्यान खेळाडूंना तीन गटांत विभागण्यात आले होते. आयर्लंडविरुद्धच्या लढतीसाठी केएल राहुलची निवड अंतिम अकरा जणांत पक्की मानली जात आहे. मधल्या फळीसाठी सुरेश रैना, दिनेश कार्तिक आणि मनीष पांडे यांच्यात चुरस असेल. सुरेश रैनाचा उपयोग सहावा गोलंदाज म्हणून केला जाऊ शकतो.दक्षिण आफ्रिका दौºयात रैनाला पिंच हिटरच्या रूपाने उपयोग करण्यात आला हाता. जबरदस्त फॉर्मात असणारा कार्तिकदेखील संघात असू शकतो. अशा परिस्थितीत ८ टी-२० सामन्यात ८५ च्या सरासरीने २५५ धावा केल्यानंतरही मनीष पांडे संघाबाहेर राहू शकतो. गोलंदाजीत कोहली युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना येथील परिस्थितीशी जुळवून घेता यावे, यासाठी संधी देऊ शकतो. वेगवान गोलंदाजी ही संघासाठी थोडी चिंतेची बाब आहे. बुमराह आणि भुवनेश्वर यांच्या खांद्यावर जास्त जबाबदारी असेल.कारण उमेश यादवने प्रदीर्घ काळानंतर टी-२० संघात पुनरागमन केले आहे आणि सिद्धार्थ कौलने या स्वरूपात अद्याप पदार्पण केलेले नाही. भारताने आयर्लंडविरुद्ध जास्त सामने खेळलेले नाहीत. दोन्ही संघांदरम्यान आतापर्यंत तीन एकदिवसीय आणि एक टी-२० सामने झाले आहेत.आयर्लंडसाठी कर्णधार गॅरी विल्सन, माजी कर्णधार विल्यम पोर्टरफिल्ड आणि अष्टपैलू केव्हिन ओ’ब्रायन यांना भारतीय संघाविरुद्ध टी-२० खेळण्याचा अनुभव आहे. दरम्यान, पंजाबात जन्म झालेल्या आयर्लंडच्या ३१ वर्षीय आॅफस्पिनर सिमरनजितसिंह याच्याकडेही सर्वांचे लक्ष असेल. सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल.