Join us  

दारूच्या नशेत शिवीगाळ अन् कुकिंग पॅननं मारहाण; विनोद कांबळीविरोधात पत्नीची पोलिसात तक्रार!

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. यावेळी पत्नीला मारहाण केल्याने तो अडचणीत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2023 11:13 AM

Open in App

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. यावेळी पत्नीला मारहाण केल्याने तो अडचणीत आला आहे. दारू पिऊन शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार त्याच्या पत्नीने पोलिसात दाखल केली आहे. कांबळीबाबतचे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो वादात सापडला आहे.

वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळीविरुद्ध कलम ३२४ आणि कलम ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर पत्नीवर स्वयंपाकाचे भांडे फेकून मारल्याचा आरोप आहे, यात पत्नीच्या डोक्यालाही मार लागला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार कांबळी आणि त्याची पत्नी यांच्यात मध्यरात्री १ ते १.३० च्या सुमारास भांडण झालं. त्यावेळी विनोद कांबळी मद्यधुंद अवस्थेत त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटवर आला. त्यानं पत्नीला शिवीगाळ करण्या सुरुवात केली. दोघांचं भांडण पाहून त्यांचा १२ वर्षांचा मुलगा देखील घाबरला.

हे भांडण केवळ शिवीगाळ करण्यापुरते मर्यादित राहिले नाही, त्यानंतर कांबळीने स्वयंपाकघरात जाऊन कुकिंग पॅन उचलला आणि पत्नीच्या दिशेने फेकून मारला. पोलिसांनी सांगितले की, तक्रार देण्यासाठी येण्यापूर्वी कांबळीच्या पत्नीने भाभा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय उपचार केले होते. घटनेनंतर विनोद कांबळीचा मोबाईल स्विच ऑफ येत आहे. पत्नीने त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमध्ये, मारहाण आणि मुलाला शिवीगाळ करतो असं नमूद केलं आहे. तसंच विनोद कांबळीनं कुकिंग पॅननं मारलं. इतकंच नव्हे, तर बॅटनंही मारहाण केली आहे.

दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या विनोद कांबळीला याआधी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर दारूच्या नशेत त्याने कारला धडक दिली होती. १९९० च्या दशकात विनोद कांबळीने भारतीय संघात स्थान मिळवले आणि तो बराच काळ संघाचा भाग होता. त्याने भारतासाठी १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळले असून त्याच्या नावावर ३५०० हून अधिक धावा आहेत.

टॅग्स :विनोद कांबळी
Open in App