भारतीय संघानं अहमदाबाद कसोटीत ( Ahmedabad Test) इंग्लंडचा दोन दिवसांत पराभव केला. इंग्लंडला पहिल्या डावात ११२ व दुसऱ्या डावात ८१ धावाच करता आल्या. भारतानं पहिल्या डावात १४५ धावा करून ३३ धावांची आघाडी घेतली होती आणि ४९ धावांचं माफक लक्ष्य त्यांनी एकही विकेट न गमावता पार केलं. अक्षर पटेलनं ( Axar Patel) ११ विकेट्स घेतल्या, तर आर अश्विननं ( R Ashwin) ७ बळी टिपले. अवघ्या दोन दिवसांत कसोटीचा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा खेळपट्टीचा ( Pitch) मुद्दा चर्चिला जात आहे. भारताचे माजी खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) आणि इरफान पठाण ( Irfan Pathan) यांनीही या सामन्यानंतर खेळपट्टीवर शंका उपस्थित केली आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियानं रचला इतिहास; नोंदवले १० मोठे विक्रम
युवराजनं ट्विट केलं की,''दोन दिवसांत निकाल लागणे, हे कसोटी क्रिकेटसाठी चांगलं आहे की नाही, याबाबत संभ्रमात आहे. अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांना अशा खेळपट्टी मिळाल्या असत्या तर त्यांनी १००० व ८०० विकेट्स घेतल्या असत्या? भारतीय संघाचे अभिनंदन. अक्षर पटेलनं चांगली गोलंदाजी केली. आर अश्विन व इशांत शर्मा यांचेही अभिनंदन.''
भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीचा निकाल हा ८४२ चेंडूंत लागला. १९३५ नंतर हा सर्वात कमी चेंडूत लागलेला निकाल आहे. १९३५मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड या कसोटीचा निकाल ६७२ चेंडूत लागला होता.