Join us  

अंतिम सामना जिंकल्यावर रोहितने मैदानात फडकवला श्रीलंकेचा झेंडा

अंतिम फेरी जिंकल्यावर मैदानातील प्रेक्षकांचे आभार मानताना रोहितने यावेळी श्रीलंकेचा झेंडा घेतल्याचे पाहायला मिळाले. रोहितने यावेळी श्रीलंकेचा झेंडा का हातात धरला, हे कोडे बऱ्याच जणांना उलगडलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 4:37 PM

Open in App
ठळक मुद्देजेतेपद पटकावल्यानंतर मैदानात फिरत असताना रोहितने श्रीलंकेच्या एका चाहत्याकडून त्यांचा झेंडा मागितला.

श्रीलंका : विजय मिळवल्यावर खेळाडू मैदानात आपला झेंडा अभिमानाने मिरवतात, हे साऱ्यांच्या परवलीचे आहे. पण निदाहास ट्रॉफीची अंतिम फेरी जिंकल्यावर मात्र असे काही पाहायला मिळाले नाही. कारण अंतिम फेरी जिंकल्यावर मैदानातील प्रेक्षकांचे आभार मानताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने यावेळी श्रीलंकेचा झेंडा घेतल्याचे पाहायला मिळाले. रोहितने यावेळी श्रीलंकेचा झेंडा का हातात धरला, हे कोडे बऱ्याच जणांना उलगडलेले नाही.

अंतिम सामन्यात अखेरच्या दोन षटकात विजयासाठी 34 धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने केवळ 8 चेंडूत नाबाद 29 धावांचा तडाखा देत भारताला बांगलादेशविरुद्ध चार गडी राखून थरारक विजय मिळवून दिला. यासह प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये टी20 तिरंगी मालिकेत सहभागी झालेल्या युवा भारतीय संघाने दिमाखदार जेतेपद उंचावले. दिनेश कार्तिकने केलेल्या धमाकेदार खेळीच्या बळावर भारताने निदाहास चषक पटकावला.

सामना जिंकल्यावर भारतीय संघाने मैदान्यातील चाहत्यांचे अभिनंदन करायचे ठरवले.  जेतेपद पटकावल्यानंतर मैदानात फिरत असताना रोहितने श्रीलंकेच्या एका चाहत्याकडून त्यांचा झेंडा मागितला. त्या चाहत्यानेही श्रीलंकेचा झेंडा दिला. त्यानंतर मैदानात फिरत असताना श्रीलंकेच्या चाहत्यांनी रोहितला डोक्यावर घेतले.

या मालिकेतील काही गोष्टींमुळे श्रीलंकेचे चाहते नाराज होते. यजमानांना यावेळी अंतिम फेरीत स्थानही पटकावता आले नाही. पण तरीही श्रीलंकेचे चाहते मैदानात हजर होते. अंतिम सामन्यादरम्यान श्रीलंकेच्या चाहत्यांनी भारताला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी रोहितने श्रीलंकेचा झेंडा हातात घेतला, असे म्हटले जात आहे.

टॅग्स :रोहित शर्मानिदाहास ट्रॉफी २०१८