Join us  

OMG : लिओनेल मेस्सीसह वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंना वाचवण्यासाठी मागवावं लागलं हेलिकॉप्टर, Video

वर्ल्ड कप विजयानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंचे मायदेशात जंगी स्वागत झाले. आपल्या आवडत्या खेळाडूंची झलक पाहण्यासाठी आणि अर्जेंटिनाच्या ३६ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी लाखो लोक ब्युनोस आयर्सच्या रस्त्यावर उतरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 12:38 PM

Open in App

Fifa World Cup 2022 : लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने अखेर ३६ वर्षांनी फुटबॉल वर्ल्ड कप उंचावला. पेनल्टी शूट आऊटमध्ये रंगलेल्या थरारक लढतीत अर्जेंटिनाने गतविजेत्या फ्रान्सवर ४-२ ( ३-३) असा रोमहर्षक विजय मिळवला. वर्ल्ड कप विजयानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंचे मायदेशात जंगी स्वागत झाले. आपल्या आवडत्या खेळाडूंची झलक पाहण्यासाठी आणि अर्जेंटिनाच्या ३६ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी लाखो लोक ब्युनोस आयर्सच्या रस्त्यावर उतरले. त्यामुळे रस्त्यांवर सर्वत्र जॅम झाला आणि खेळाडूंची परेडही मध्येच थांबवावी लागली. लोकांच्या हातात झेंडे होते, ते उत्साहाने नाचत होते आणि गात होते पण त्यांची संख्या इतकी जास्त होती की त्यामुळे खेळाडूंची खुल्या बसमधील परेड थांबवून, त्यांना हेलिकॉप्टरमधून परेड करावी लागली. अर्जेंटिना सरकारने याला हवाई परेड म्हटले.

'GOAT' कोण ही चर्चा संपली! लिओनेल मेस्सीने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोला दिला आणखी एक धक्का

अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांच्या प्रवक्त्या, गॅब्रिएला सेरुती यांनी सोशल मीडियावर लिहिले: "जागतिक विजेते संपूर्ण मार्गावर हेलिकॉप्टरने उड्डाण करत आहेत, कारण मोठ्या संख्येने लोक आल्याने रस्त्यावरून परेड सुरू ठेवणे अशक्य होते. हेलिकॉप्टर राजधानीबाहेर असलेल्या अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनच्या मुख्यालयात पोहोचले. काही चाहत्यांनी अजूनही रस्त्यावर आनंदोत्सव साजरा केला, परंतु १९८६  नंतर प्रथमच त्यांच्या संघाने वर्ल्ड कप जिंकल्याची झलक पाहण्यास न मिळाल्याने अनेक चाहत्यांची निराशा झाले.   टीमची एक झलक पाहण्यासाठी सकाळपासून वाट पाहत असलेले २५ वर्षीय डिएगो बेनाविडेझ म्हणाले, 'उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सज्ज होतो, पण सरकारने व्यवस्थित आयोजित केले नाही, म्हणून आम्ही संतापलो आहोत. त्यांनी आमच्याकडून वर्ल्ड कप विजयाचा आनंद हिरावून घेतला आहे.’     

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२अर्जेंटिनालिओनेल मेस्सीफ्रान्स
Open in App