Join us  

संथ खेळपट्टीमुळे दिल्लीचा अपेक्षाभंग होण्याची भीती

दिल्लीने आपल्या नावापुढील‘ डेव्हिल्स’ शब्द काढून टाकला तरी मुंबई इंडियन्सविरुद्ध या संघाने ‘निडर’ खेळ केला. मुंबईचे गोलंदाज विशेषत: ऋषभ पंतच्या खेळीमुळे बुचकळ्यात पडले असावेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 12:57 AM

Open in App

- हर्षा भोगले लिहितात...दिल्लीने आपल्या नावापुढील‘ डेव्हिल्स’ शब्द काढून टाकला तरी मुंबई इंडियन्सविरुद्ध या संघाने ‘निडर’ खेळ केला. मुंबईचे गोलंदाज विशेषत: ऋषभ पंतच्या खेळीमुळे बुचकळ्यात पडले असावेत. पंतच्या खेळीदरम्यान तीन प्रसंग पाहून माझे डोळे विस्फारले गेले आणि तोंडचा शब्द बाहेर पडेनासा झाला. एका हाताने मारलेला षटकार, हेलिकॉफ्टर शॉटद्वारे मारलेला पूलचा फटका आणि अर्धशतकावर शिक्कामोर्तब करताना मारलेले सलग तीन चौकार, या तिन्ही प्रसंगांमुळे मी खुर्चीवर उभा झालो होतो. युवा खेळाडूची ही धडक कामगिरी होती की प्रतिभवान खेळाडूच्या कौशल्याची झलक होती, हे माहिती नाही, पण पंतबाबत वाटचालीतील अनेक गोष्टी मला ठाऊक आहेत.पंतच्या फलंदाजीत कठोरपणा होता, तर रबाडाच्या गोलंदाजीत लवचिकता होती. कॉलेजमध्ये असताना अशाप्रकारची थिअरी शिकलो होतो. ती हीच असावी, याची जाणीव झाली. सहजपणे, लयबद्ध आणि कुठलेही अतिरिक्त प्रयत्न न करता काही पावले धावताच रबाडा १४३ किलो प्रतिताशी वेगाने गोलंदाजी करतो. नंतरच्या तीन चेंडूत तो सहजरीत्या १५० चा वेग देखील गाठतो.सध्या अनेक गोलंदाज स्वत:च्या चेंडूचा वेग कमी करीत आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडासारखा मारा करताना मात्र वेग कमी करणे हे कुणालाही सवलत दिल्यासारखे वाटते. बॅले नृत्यासाठी लग्नात नाचणाऱ्या मुलींनी पाहुण्यांना आनंद देण्यासाठी ‘हिप थ्रस्ट’ करावे, असाच हा प्रकार आहे. हे टी२० क्रिकेट आहे, येथे सर्व गोष्टी लागू आहेत.बोल्ट, इशांत, मॉरिस व अवेश खान यांची उपलब्धता लक्षात घेता दिल्लीला फिरोजशाह कोटलावर फलंदाजीनुकूल खेळपट्टीची गरज असेल.संथ व चेंडू उसळी न घेणाऱ्या खेळपट्टीवर मात्र यजमान संघाच्या आशा धुळीस मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी धोनीचा चेन्नई सुपरकिंग्स संघ चेंडूगणिक प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर दडपण आणू शकतो. दिल्ली कॅपिटल्स संघाला यंदाच्या मोसमात स्वत:चा मार्ग प्रशस्त करायचा झाल्यास ‘पीच क्यूरेटर’ने दिल्ली संघाच्या मनातले जाणून घ्यायला हवे.

टॅग्स :आयपीएल 2019