Join us  

Shahid Afridi vs Shaheen Afridi, PSL 2022: जावई अन् सासरा आले आमनेसामने; क्रिेकेटच्या मैदानात शाहीन-शाहिदमध्ये रंगलं युद्ध

सासऱ्याचा संघ जिंकला की जावयाचा.. वाचा कसा रंगला सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 12:58 PM

Open in App

Shahid Afridi vs Shaheen Afridi, PSL 2022: पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये सोमवारी जबरदस्त सामना झाला. लाहोर कलंदरने २०० हून अधिक धावा केल्या तर प्रत्युत्तरात क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून जेसन रॉयने झंझावाती शतक झळकावत संघाला चित्तथरारक विजय मिळवून दिला. तुफान फटकेबाजी व्यतिरिक्त आणखी एका कारणामुळेही हा सामना चर्चेत राहिला. ते कारण म्हणजे जावई आणि सासरा यांच्यातील क्रिकेटच्या मैदानातलं युद्ध.

सामन्यात सासरा शाहीद आफ्रिदी आणि जावई शाहीन शाह आफ्रिदी यांच्यात अटीतटीची झुंज पाहायला मिळाली. लाहोर कलंदरचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्सचा स्टार खेळाडू शाहिद आफ्रिदी असे दोघे आमनेसामने उभे ठाकले. फलंदाजी किंवा गोलंदाजीच्या वेळी दोन्ही खेळाडूंची प्रत्येक्षात झुंज पाहायला मिळाली नाही, पण दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत नक्कीच झाली.

शाहिद आफ्रिदीच्या मोठ्या मुलीशी शाहीनचा झालाय साखरपुडा

शाहिद आफ्रिदीची मोठी मुलगी अक्सा हिचा शाहीन शाह आफ्रिदीसोबत साखरपुडा झाला आहे. शाहिद आफ्रिदीनेच गेल्या वर्षी याची घोषणा केली होती. लवकरच हे दोघे लग्न करणार आहेत. शाहिद आफ्रिदीला पाच मुली आहेत. अक्सा, अंशा, ऐज्वा, अस्मारा आणि अर्वा. अक्सा ही त्यापैकी सर्वात मोठी आहे. तिच्यासोबत शाहीन आफ्रिदीचा साखरपुडा झाला आहे. शाहीन शाह आफ्रिदी गेल्या एक-दोन वर्षांत पाकिस्तानसाठी एक मोठा स्टार खेळाडू म्हणून उदयास आला आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेतील त्याची दमदार कामगिरी पाहता त्याला ICC कडून मोठा सन्मानही मिळाला आहे.

सामन्यात सासरा-जावयानं काय केलं?

सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास दोन्ही खेळाडूंना एकही विकेट मिळवता आली नाही. शाहिद आफ्रिदीने तीन षटकं टाकून २५ धावा दिल्या. तर शाहीन शाह आफ्रिदीने ४ षटकांत ४० धावा दिल्या. फलंदाजीत शाहिद आफ्रिदीला संधीच मिळू शकली नाही. सामन्यात अखेरीस सासऱ्याचा संघ जिंकला तर जावयाच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तान
Open in App