Join us  

टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूच्या घरी कोरोनाचा शिरकाव, आई-वडिलांना झालाय कोरोना!

देशात मागील २४ तासांत ३ लाख ६२,७२७ नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर ३ लाख ५२,१८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ४१२० जणांना प्राण गमवावे लागले आहे,

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 2:16 PM

Open in App

भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) याच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. चहलचे वडील केके चहल आणि आई सुनिता देवी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ते हरयाणात राहतात आणि केके चहल हे वकील आहेत. वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे, तर आई  घरीच आयसोलेट झाली आहे. 

आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाकडून खेळणाऱ्या चहलनं २०२१च्या पर्वात ७ सामन्यांत फक्त ४ विकेट्स घेतल्या. त्याचा फॉर्म सध्या हरवलेला आहे. भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठीच्या संघात चहलच हा संघातील प्रमुख फिरकीपटू असेल. ( The father and mother of Yuzvendra Chahal have been tested positive for COVID-19) 

चहलती पत्नी धनश्री वर्मा हिनं इस्टा स्टोरीवरून ही माहिती दिली. तिनं सांगितलं की,''माझी आई आणि भाऊ यांना कोरोना झाला होता. तेव्हा मी आयपीएल बायो बबलमध्ये होते आणि स्वतःला असह्य समजत होते. आता त्यांनी कोरोनावर मात केली आहे. पण, सासू-सासऱ्यांना कोरोना झाला आहे. सासऱ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे, तर सासूवर घरीच उपचार सुरू आहेत.

 

देशात मागील २४ तासांत ३ लाख ६२,७२७ नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर ३ लाख ५२,१८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ४१२० जणांना प्राण गमवावे लागले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही २ कोटी ३७ लाख ०३,६६५ इतकी झाली आहे. त्यापैकी १ कोटी ९७ लाख, ३४,८२३ रुग्ण बरे झाले आहेत. मृतांची संख्या ही २ लाख ५८,१३७ इतकी आहे. आतापर्यंत १७ कोटी ७२ लाख १४,२५६ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.   

टॅग्स :युजवेंद्र चहलकोरोना वायरस बातम्या