IPL 2021: तेज तर्रार...! दिल्ली कॅपिटल्सच्या नॉर्खियानं टाकला यंदाच्या सीझनचा सर्वात वेगवान चेंडू; फलंदाजही चक्रावला 

IPL 2021, Anrich Nortje: एन्रीच नॉर्खिया आणि कगिसो रबाडा यांच्या गोलंदाजीचा वेग पाहून प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 08:52 PM2021-09-22T20:52:59+5:302021-09-22T20:55:17+5:30

whatsapp join usJoin us
Fastest ball of the IPL 2021 bowled by delhi capitals anrich nortje against Sunrisers Hyderabad | IPL 2021: तेज तर्रार...! दिल्ली कॅपिटल्सच्या नॉर्खियानं टाकला यंदाच्या सीझनचा सर्वात वेगवान चेंडू; फलंदाजही चक्रावला 

IPL 2021: तेज तर्रार...! दिल्ली कॅपिटल्सच्या नॉर्खियानं टाकला यंदाच्या सीझनचा सर्वात वेगवान चेंडू; फलंदाजही चक्रावला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Anrich Nortje: आयपीएलमध्ये आज दुबईच्या स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स यांच्यात सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्स सामन्यात वर्चस्व पाहायला मिळत असून दक्षिण आफ्रिकेच्या दोन वेगवान गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना जेरीस आणलं आहे. एन्रीच नॉर्खिया आणि कगिसो रबाडा यांच्या गोलंदाजीचा वेग पाहून प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. 

कोरोनामुळे आयपीएल पुन्हा स्थगित झाली तर काय होईल? नेटिझन्सनं दिल्या भन्नाट प्रतिक्रिया...

सामन्याच्या पहिल्याच षटकात एन्रीच नॉर्खियानं तब्बल १५०.१ गतीनं चेंडू टाकला आणि नॉर्खियाचा हा चेंडू आयपीएलच्या यंदाच्या सीझनचा सर्वात वेगवान चेंडू ठरला. पण नॉर्खियानं मात्र आपलाच विक्रम मोडण्याचं ठरवलेलं होतं की काय त्यानं आपल्या पुढच्याच षटकात तब्बल १५१.७ या वेगानं चेंडू फेकला. याआधी कगिसो रबाडा याच्या नावावर यंदाच्या सीझनचा सर्वात वेगवान गोलंदाजीचा विक्रम जमा होता. त्यानं १४८.७३ इतक्या वेगानं चेंडू टाकला होता. 

तुम्ही कधी जिंकता, कधी हरता; पण नेहमी शिकता!, हा केवळ फोटो नाही...प्रेरणा आहे

एन्रीच नॉर्खियानं मात्र आजच्या सामन्यात कमाल केली आहे. नॉर्खियाच्या वेगवान अस्त्रानं हैदराबादचे फलंदाजही आश्चर्यचकीत झालेले पाहायला मिळाले. नॉर्खियाचे केवळ दोन चेंडू वेगवान नव्हते. तर त्यानं संपूर्ण षटकात वेगात सातत्य राखलेलं पाहायला मिळालं आहे. एका षटकात त्यानं १५१.३७, १५०.८३, १४९.९७, १४९.२९, १४८.७६ इतक्या वायुवेगानं गोलंदाजी केली आहे. त्यानं सामन्याच्या पहिल्याच षटकात हैदराबादला मोठा धक्का देखील दिला. विस्फोटक डेव्हिड वॉर्नर याला एन्रीच नॉर्खियानं शून्यावर बाद केलं. नॉर्खियाच्या वेगवान चेंडूवर वॉर्नरच्या बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू थेट अक्षर पटेलच्या हातात जाऊन विसावला आणि वॉर्नर झेलबाद होऊन तंबूत दाखल झाला. 

नॉर्खियानंच टाकलाय आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू
एन्रीच नॉर्खियानं फक्त यंदाच्या सीझनमध्ये वेगवान चेंडू टाकलाय असंही नाही. आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम आजही एन्रीच नॉर्खिया याच्याच नावावर जमा आहे. त्यानं गेल्या सीझनमध्ये १५६.२२ इतक्या वेगानं चेंडू टाकला होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर देखील त्याचंच नाव जमा आहे. नॉर्खियानं याआधी १५५.२१ आणि १५४.७४ इतक्या वेगानं गोंलदाजी केली आहे. 

Web Title: Fastest ball of the IPL 2021 bowled by delhi capitals anrich nortje against Sunrisers Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.