Join us  

'विराट' तोफखाना; कोहलीच्या नेतृत्वात वेगवान गोलंदाजांचं वर्चस्व

विदेशातही भारतीय गोलंदाजी बहरली; सीम व स्विंगची ताकद वाढल्याने आली भेदकता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 12:56 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय गोलंदाजांनी गेल्या १० कसोटी सामन्यात १८६ बळी घेतले असून त्यात १२३ बळी वेगवान गोलंदाजांच्या खात्यात गेले आहेत. यावरुन गेल्या काही वर्षात भारताच्या आक्रमणामध्ये सीम व स्विंगची ताकद वाढली असल्याची प्रचिती येते. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव यांच्यासारख्या वेगवान गोलंदाजांनी केवळ मायदेशातच नव्हे तर विदेशातही आपली छाप सोडली आहे.कर्णधार विराट कोहलीनेही त्यांच्यावर पूर्ण विश्वास दर्शवला आहे. भारतीय संघ गेल्या वर्षभरात १० पैकी ८ सामने जिंकण्यात यशस्वी ठरला असून त्यात वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. त्यांनी या सामन्यांत १०२ बळी घेतले आहेत. रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांच्या नेतृत्वाखालील फिरकीपटूंनी या सामन्यांत ५४ बळी घेतले आहेत. (वृत्तसंस्था)कर्णधार कसोटी सामने बळीमहेंद्रसिंग धोनी ६० सामने फिरकीपटू ४७०, वेगवान गोलंदाज ४६६ बळीसौरव गांगुली ४९ सामने फिरकीपटू ४०४, वेगवान गोलंदाज ३६१ बळीमोहम्मद अझहरुद्दीन ४७ सामने फिरकीपटू ३७९, वेगवान गोलंदाज ३१९ बळीसुनील गावस्कर ४७ सामने फिरकीपटू ३१०, वेगवान गोलंदाज ३०४ बळीमंसूर अली खा पतोडी ४० सामने फिरकीपटू ४६८, वेगवान गोलंदाज १०९ बळीकपिल देव ३४ सामने फिरकीपटू २२८, वेगवान गोलंदाज २११ बळीसचिन तेंडुलकर २५ सामने फिरकीपटू १५७, वेगवान गोलंदाज १८२ बळीराहुल द्रविड २५ सामने फिरकीपटू १८६, वेगवान गोलंदाज २११ बळीकुणी किती बळी घेतलेमोहम्मद शमी १० सामने ४५ बळीजसप्रीत बुमराह ६ सामने ३४ बळीइशांत शर्मा ८ सामने २७ बळीउमेश यादव ४ सामने १७ बळीरविचंद्रन अश्विन ५ सामने २६ बळीरवींद्र जडेजा ८ सामने २६ बळी१९३२ पासूनची आकडेवारी५३९ सामने ७७६० बळी३२६० बळी(११२ वेगवान गोलंदाज)४४०१ बळी (९७ फिरकीपटू)९९ बळी फिरकी व मध्यमगती अशा दोन्ही प्रकारे गोलंदाजी करणाऱ्यांनी घेतले. (उदा. दत्तू फडकर यांनी कारकिर्दीत ६२ बळी घेतले आहेत.)कोहलीच्या नेतृत्वाखालील गोलंदाज५२ कसोटी सामने ९११ एकूण बळी४३४ बळी (वेगवान गोलंदाज)४७७ बळी (फिरकीपटू)मायदेशात २५ कसोटीत फिरकीपटूंनी ३०७ व वेगवान गोलंदाजांनी १५१ बळी घेतले. इंदूरमध्ये बांगलादेशविरुद्ध भारतीय वेगवान गोलंदाजांनी १४ बळी घेतले. मायदेशात खेळताना एक सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांची ही सातवी सर्वोत्तम कामगिरी आहे. विक्रम १७ बळींचा असून हा २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलकातामध्ये नोंदवला गेला होता.

टॅग्स :विराट कोहलीमोहम्मद शामीजसप्रित बुमराहइशांत शर्माआर अश्विनरवींद्र जडेजा