वेगवान गोलंदाज उमेश यादव ठरू शकतो भुवनेश्वर कुमारचा योग्य पर्याय

वेस्ट इंडिजसारख्या आक्रमक संघाविरुद्ध हवेमध्ये वेग महत्त्वाचा ठरतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 04:45 AM2019-12-18T04:45:13+5:302019-12-18T04:45:29+5:30

whatsapp join usJoin us
Fast bowler Umesh Yadav could be the right choice for Bhuvneshwar Kumar | वेगवान गोलंदाज उमेश यादव ठरू शकतो भुवनेश्वर कुमारचा योग्य पर्याय

वेगवान गोलंदाज उमेश यादव ठरू शकतो भुवनेश्वर कुमारचा योग्य पर्याय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शिमरोन हेटमायेर व शाई होप यांच्यादरम्यानच्या मोठ्या भागीदारीमुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजींच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. बुमराह व हार्दिक पांड्या यांच्या पुनरागमनानंतर ही अडचण काही अंशी सोडविल्या जाईल, पण बेंच स्ट्रेंथ चिंतेचा विषय आहे. माझ्या मते उमेश यादव भुवनेश्वर कुमारचा योग्य पर्याय ठरू शकतो.
वेस्ट इंडिजसारख्या आक्रमक संघाविरुद्ध हवेमध्ये वेग महत्त्वाचा ठरतो. उमेश यादव थोडा महागडा ठरू शकतो, पण तो एक किंवा दोन बळी नक्कीच घेऊ शकतो. गोलंदाजी संयोजनावर लक्ष देणे भारतीय संघासाठी आवश्यक आहे. शिवम दुबेला सध्या अष्टपैलू संबोधता येणार नाही. त्याला पाचवा गोलंदाज म्हणून कर्णधार विराट कोहलीचा आत्मविश्वास मिळविण्यासाठी आपल्या गोलंदाजीत बरीच सुधारणा करावी लागेल.
कुलदीप यादव व चहल यांना एकत्र खेळविण्याची कल्पनाही वाईट नाही. मायदेशातील परिस्थितीत संघात माझ्या मते दुबेच्या स्थानी स्पेशालिस्ट फलंदाज संघात असावा. कुठलाही संघ विजयाच्या तुलनेत पराभवातून अधिक शिकतो व कोचिंग स्टाफ या सर्व बाबींवर लक्ष देईल, असा विश्वास आहे. क्षेत्ररक्षणाची पातळीही सातत्याने खालावत आहे.
भारताला खेळाच्या तिन्ही विभागात सुधारणा करावी लागेल. विंडीजने निश्चितच भारताला जागे केले. हेटमायेर अद्भूत होता, तर होपने शानदार कामगिरी केली. आक्रमक फलंदाजांचा भरणा असलेल्या संघात होप शांत फलंदाज आहे. अनेकदा त्याचा स्ट्राईक रेट कमी असू शकतो. विशेषत: त्याचा सहकारी चांगल्या फॉर्ममध्ये असल्यानंतर. कधी काळी डेसमंड हेन्स अशी भूमिका बजावत होता. पराभवानंतरही यजमान अद्याप अखेरचे दोन सामने जिंकण्याचा दावेदार आहे. अतिघाई करण्याची कुठलीही गरज नसून योग्य संघासह सकारात्मक खेळाची गरज
आहे. (टीसीएम)
कृष्णम्माचारी श्रीकांत लिहितात

Web Title: Fast bowler Umesh Yadav could be the right choice for Bhuvneshwar Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.