विराट कोहली दुसऱ्यांदा 'बाप' झाला, पाकिस्तानमध्ये मिठाई वाटल्या गेल्या; Video Viral 

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 12:53 PM2024-02-21T12:53:17+5:302024-02-21T12:53:36+5:30

whatsapp join usJoin us
Fans in Pakistan distributed sweets on the occasion of Virat Kohli's new born baby boy, Video Viral  | विराट कोहली दुसऱ्यांदा 'बाप' झाला, पाकिस्तानमध्ये मिठाई वाटल्या गेल्या; Video Viral 

विराट कोहली दुसऱ्यांदा 'बाप' झाला, पाकिस्तानमध्ये मिठाई वाटल्या गेल्या; Video Viral 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली. ५ दिवसांपूर्वी म्हणजे १५ फेब्रुवारीला विराट-अनुष्का दुसऱ्यांदा आई-बाबा झाले, भारतीय फलंदाजाने सोशल मीडियावरून ही गोड बातमी दिली. विराटने सध्या सुरु असलेल्या इंग्लंड विरूद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. विराट  कोणत्या वैयक्तिक कारणामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. 


विराट व अनुष्का यांनी त्यांच्या मुलाचे नाव अकाय असे ठेवल्याचेही जाहीर केले. विराटचा लंडनमधील फोटोही समोर आला आहे. विराट कोहलीच्या या गोड बातमीचे जगभरातील चाहत्यांनी सेलिब्रेशन केले. पाकिस्तानमध्येही विराट कोहली दुसऱ्यांदा बाप झाला म्हणून चाहत्याने मिठाई वाटल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चाहत्याने केवळ विराटचे कौतुक केले नाही, तर अकाय हा विराटचे क्रिकेटमधील सर्व रेकॉर्ड मोडेल, असेही म्हटले.  



Fair to say that fans in Pakistan want Virat's son Akaay to follow his father's footsteps one day, just like Arjun Tendulkar has, following his father Sachin Tendulkar.

विराट कोहली व अनुष्का शर्मा यांना तीन वर्षांची मुलगी आहे आणि वामिका असे तिचे नाव आहे. अकायच्या जन्माची बातमी देताना विराटने पोस्टे लिहिली की, "आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारी रोजी आम्ही आमचा मुलगा याचे स्वागत केले. वामिकाच्या धाकट्या भावाचे नाव या जगात स्वागत केले. आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो. आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या गोपनीयतेचा आदर करा. धन्यवाद."

विराट कोहली पाचव्या  कसोटीत खेळणार?
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत संघात नाव असूनही विराटने माघार घेतली होती. विशाखापट्टणम कसोटीनंतर विराट राजकोट येथे खेळेल अशी आशा होती आणि विराटच्या रिप्लायची वाट पाहत बीसीसीआयने संघ उशीरा जाहीर केला. पण, त्यातही विराटचे नाव दिसले नाही आणि तो चौथी कसोटीही खेळणार नाही, हे बीसीसीआयच्या कालच्या ट्विटने स्पष्ट झाले. पण, आता तरी तो पाचव्या कसोटीत खेळेल का असा प्रश्न पडतोय. BCCI ने चौथ्या कसोटीचा संघ काल जाहीर केला. याचा अर्थ पाचव्या कसोटीत विराटच्या पुनरागमनाची आशा अजूनही कायम आहे. तुर्तास तरी विराट-अनुष्का आणि त्याचं नवीन बाळ लंडनमध्ये आहेत. 

Web Title: Fans in Pakistan distributed sweets on the occasion of Virat Kohli's new born baby boy, Video Viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.