Join us  

CSK vs DC Latest News : फॅफ ड्यू प्लेसिसचा CSKकडून भारी विक्रम, त्याला बाद करून कागिसो रबाडाचा मोठा पराक्रम!

करो वा मरो सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) गोलंदाज तुषार देशपांडे यानं पहिल्याच चेंडूंवर CSKला धक्का दिला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 17, 2020 8:52 PM

Open in App

करो वा मरो सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) गोलंदाज तुषार देशपांडे यानं पहिल्याच चेंडूंवर CSKला धक्का दिला. सॅम कुरननं पहिलाच चेंडू सीमापार टोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु अॅनरीच नॉर्ट्झेनं तो झेल टिपला. शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) यांनी CSKला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करून दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावा जोडल्या. फॅफनं यदाच्या मोसमातील चौथे अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं ३९ चेंडूंत ५० धावा केल्या, पण पुढच्याच चेंडूवर वॉटसन त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. नॉर्ट्झेनं ३६ धावा करणाऱ्या वॉटसनला बाद केले.

चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाजसुरेश रैना - ४५२७महेंद्रसिंग धोनी - ३९९१फॅफ ड्यू प्लेसिस - २०००*माईक हसी - १७६८  कागिसो रबाडानं CSKला मोठा धक्का दिला. १५ व्या षटकात रबाडानं अर्धशतकवीर फॅफला बाद केले. फॅफनं ४७ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा केल्या. रबाडाची ही IPL मधील ५०वी विकेट ठरली. आयपीएलमध्ये सर्वात जलद ५० विकेट घेण्याचा विक्रम रबाडानं नावावर केला. त्यानं २७ सामन्यांत विकेट्सचे अर्धशतक साजरे केले.

सर्वात जलद विकेटचे अर्धशतक २७ सामने - कागिसो रबाडा३२ सामने - सुनील नरीन३३ सामने - लसिथ मलिंगा३५ सामने - इम्रान ताहीर  ३६ सामने - मिचेल मॅक्लेघन

कमी चेंडूंत ५० विकेट्स घेणारे गोलंदाज६१६ चेंडू - कागिसो रबाडा७४९ चेंडू - लसिथ मलिंगा७६० चेंडू - सुनील नरीन७६० चेंडू -  इम्रान ताहीर७९७ चेंडू - मोहित शर्मा

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्सएफ ड्यु प्लेसीस