Fact Check : पराभव पचवू न शकलेला विराट कोहली SRH च्या खेळाडूसोबत भांडला? Video Viral

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ मध्ये १ विजय मिळवला आहे आणि त्यांना उरलेले सर्वच्या सर्व ७ सामने जिंकावे लागणार आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 05:24 PM2024-04-17T17:24:45+5:302024-04-17T17:25:09+5:30

whatsapp join usJoin us
Fact Check : virat kohli fight with srh players after RCB badly loss the game in IPL 2024, Video goes Viral | Fact Check : पराभव पचवू न शकलेला विराट कोहली SRH च्या खेळाडूसोबत भांडला? Video Viral

Fact Check : पराभव पचवू न शकलेला विराट कोहली SRH च्या खेळाडूसोबत भांडला? Video Viral

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची वाटचाल प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या दिशेने सुरू आहे. सोमवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत त्यांना स्पर्धेतील सहावा पराभव पत्करावा लागला. SRH च्या फलंदाजांमनी RCB समोर आयपीएल इतिहासातील सर्वाधिक २८७ धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli) प्रचंड संतापलेला पाहायला मिळाला आणि तो मैदानावर राग काढतानाही दिसला. दरम्यान, या सामन्यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात विराट व SRH चा खेळाडू यांच्यात धक्काबुक्की होताना दिसत आहे. पण, हे भांडण आहे की काही दुसरं, हे स्पष्ट होत नाही.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ मध्ये १ विजय मिळवला आहे आणि त्यांना उरलेले सर्वच्या सर्व ७ सामने जिंकावे लागणार आहेत. सोमवारी झालेल्या लढतीत ट्रॅव्हिस हेडच्या ४१ चेंडूंत ९ चौकार व ८ षटकारांसह १०२ धावांच्या वादळी खेळीने SRH ने ३ बाद २८७ धावांचा डोंगर उभा केला. अभिषेक शर्मा ( ३४),  हेनरिच क्लासेन ( ६७) , एडन मार्कराम ( ३२*) व अब्दुल समद ( ३७*) यांनी तुफान फटकेबाजी केली. प्रत्युत्तरात, RCB ला ७ बाद २६२ धावांपर्यंत मजल मारता आली. दिनेश कार्तिक मैदानावर उभा राहिला आणि त्याने ३४ चेंडूंत ५ चौकार व ७ षटकारांसह ८३ धावांची वादळी खेळी केली, परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. 


दरम्यान, या सामन्यानंतरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात विराट व हैदराबादचा खेळाडू धक्काबुक्की करताना दिसत आहेत. त्यावरून या दोघांमध्ये भांडण झाल्याचा प्राथमिक अंदाज लावला जातोय.

पण, नीट पाहिल्यास विराट जेव्हा हैदराबादच्या खेळाडूला धक्का देतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू दिसतेय. म्हणजे हे भांडण नसून ही मस्करी सुरू असल्याचे कळेल.

 

Web Title: Fact Check : virat kohli fight with srh players after RCB badly loss the game in IPL 2024, Video goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.