Join us  

विद्यमान काळ भारतीय क्रिकेटमधील सर्वाेत्कृष्ट दौरा

तिसरा टी-२० क्रिकेट सामना जिंकण्यापासून भारतीय संघ केवळ पाच धावांनी मागे राहिला. या निकालानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावली. न्यूझीलंडने २१२ धावा केल्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 12:19 AM

Open in App

- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)तिसरा टी-२० क्रिकेट सामना जिंकण्यापासून भारतीय संघ केवळ पाच धावांनी मागे राहिला. या निकालानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावली. न्यूझीलंडने २१२ धावा केल्या होत्या. हे आव्हान सोपे नव्हते. धावांचा पाठलाग करणारी टीम इंडिया हे लक्ष्य एक षटक शिल्लक ठेवून गाठेल, अशी स्थिती काही वेळा वाटत होती. मात्र, चार फलंदाज झटपट बाद झाल्याने सामन्याचे चित्र पालटले, ज्यामध्ये विजय शंकर, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, ऋषभ पंत या फलंदाजांचा समावेश आहे.त्यानंतर, दिनेश कार्तिक आणि कुणाल पांड्या या दोघांनी सामना जिंकून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी विजय खूप जवळही आणला. मात्र, न्यूझीलंडने शेवट गोड केला. एकंदरीत, या दौऱ्याचा विचार केला, तर आॅस्ट्रेलियातील शानदार यशानंतर न्यूझीलंड दौराही भारतासाठी चांगला राहिला आहे.आतापर्यंतच्या क्रिकेट इतिहासातील हा ऐतिहासिक दौरा होता, असे म्हणता येईल. एकही सामना न गमावता म्हणजे ‘क्लीन चिट’ची संधी होती. मात्र, ती थोडक्यात हुकली, याची थोडी खंत संघ व्यवस्थापन, कर्णधार आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना जरूर असेल.न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात २०९ व तिसºया सामन्यात २१२ धावा केल्या. यावरून त्यांच्या फलंदाजाविरुद्ध भारतीय गोलंदाजांवर प्रश्न उपस्थित होतो.भारताकडे जसप्रित बुमराह नव्हता, हेही लक्षात घ्यायला हवे. खलिल अहमद युवा असून त्याच्याकडे अनुभव कमी आहे. एका बाजूने कुलदीपने रोखून धरले, तर दुसºया बाजूने धावा कुटल्या जात होत्या. त्याचाही परिणाम धावसंख्येवर झाला. त्यामुळे भारतीयांना लक्ष द्यावे लागेल. यावर ताबा ठेवण्यात भारतीय गोलंदाज कमी पडले, हे टी२० मध्ये दिसून आले.फलंदाजीत दोन सामन्यांत न्यूझीलंडने दोनशेहून अधिक धावा केल्या. अशा वेळी लक्ष्याचा पाठलाग करताना ‘ओपनिंग’ महत्त्वाची ठरते. शिखर धवन लवकर बाद झाला. २०० धावांचा पाठलाग करताना जेव्हा संघ सुरुवातीचे दोन फलंदाज गमावतो, तेव्हा मधल्या फळीवर दबाव वाढतो. तेच भारतासोबत झाले. फलंदाजबाद होत गेले आणि जी धावगती ८-९ प्रती षटक अशी असायला हवीहोती, ती १४-१५ प्रती षटक अशी होत गेली. त्यामुळे लक्ष्य हे अशक्य होत गेले.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंड