पाकिस्तानचे 10 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं विचारले दोन खोचक प्रश्न!

पाकिस्तानचा इंग्लंड दौऱा अडचणीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 12:17 PM2020-06-24T12:17:50+5:302020-06-24T12:18:41+5:30

whatsapp join usJoin us
Ex-India cricketer asks 2 pertinent questions as 7 more Pak players test positive | पाकिस्तानचे 10 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं विचारले दोन खोचक प्रश्न!

पाकिस्तानचे 10 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं विचारले दोन खोचक प्रश्न!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देपाकिस्तान क्रिकेट मंडळानं मंगळवारी आणखी 7 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे केले जाहीर

कोरोना व्हायरसच्या संकटात पाकिस्तान संघ इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाला असताना त्यांचे 10 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.  इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या 29 पैकी 10 खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. हैदर अली, हरीस रौफ आणि शादाब खान या तीन खेळाडूंनंतर फाखर जमान, इम्रान खान, कशीफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वाहब रियाझ यांना कोरोना झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. त्यामुळे भारताचा माजी कसोटीपटू आकाश चोप्रा यानं पाकिस्तानला दोन खोचक प्रश्न विचारले आहेत.

सचिन तेंडुलकरवर मात; राहुल द्रविड ठरला 50 वर्षांतील सर्वोत्तम भारतीय कसोटी फलंदाज!

वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये आधीच दाखल झाला आहे आणि मंगळवारपासून त्यांनी सराव सामन्यालाही सुरुवात केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तानचा सामना करणार आहे. या मालिकेसाठी पाकिस्तानचे खेळाडू 28 जूनला रवाना होणार आहे. तत्पूर्वी केलेला कोरोना चाचणीत पाकिस्तानचे 10 खेळाडू पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

त्यांना आता 14 दिवसांच्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार असून पुन्हा त्यांची चाचणी करण्यात येईल. त्यांचा आहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची परवानगी मिळेल. पण, त्यांना तिथे आयसोलेशनमध्ये रहावे लागेल. आकाश चोप्राने पाकिस्तानी खेळाडूच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली असून त्यांना दोन सवाल केले. त्याने विचारले की," इंग्लंड दौऱ्या होणार का? आणि या खेळाडूंना कोरोना व्हायरस कसा  झाला?" 
 


दरम्यान, आफ्रिदीनं खेळाडूंना एक सल्ला दिला. आफ्रिदीनं ट्विट केलं की,''फाखर, इम्रान खान, कशीफ, हाफिज, हसनैन, रिझवान, वाहब आणि मलंग यांची प्रकृती लवकरात लवकर सुधरावी, यासाठी प्रार्थना करतो. सर्वांना काळजी घ्या. या व्हायरला गांभीर्यानं घ्या, असं आवाहन मी पाकिस्तानी जनतेला करतो.''  

भावांनो कोरोनाला लेचापेचा समजू नका; 10 क्रिकेटपटू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शाहिद आफ्रिदीचे आवाहन  

मालिकेचे वेळापत्रक
कसोटी
5-9 ऑगस्ट - ओल्ड ट्रॅफर्ड
13-17 ऑगस्ट - साऊदम्प्टन
21-25 ऑगस्ट - साऊदम्प्टन. 
ट्वेंटी-20
29 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर 

Web Title: Ex-India cricketer asks 2 pertinent questions as 7 more Pak players test positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.