Join us  

ENGW vs INDW : टीम इंडियाच्या 10 विकेट्स 64 धावांवर पडल्या, इंग्लंड दौऱ्यावर नोंदवला नकोसा विक्रम!

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल आजपासून सुरू होणार होती, परंतु साऊदॅम्प्टन येथे पावसाने धुमाकूळ घातला अन् भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचे दोन तास वाया गेले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 5:28 PM

Open in App

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल आजपासून सुरू होणार होती, परंतु साऊदॅम्प्टन येथे पावसाने धुमाकूळ घातला अन् भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचे दोन तास वाया गेले आहेत. आता पावसाने विश्रांती घेतली असली तरी खेळ सुरू होण्यासाठी आणखी तासभर वेळ लागेल. तेच दुसरीकडे ब्रिस्टॉल येथे भारतीय महिला संघ यजमान इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळत आहेत. 7 वर्षानंतर पहिली कसोटी खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने 17 वर्षीय शेफाली वर्मासह पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. शेफाली व स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली, परंतु या दोघी माघारी परतल्यानंतर संघाचा डाव 231 धावांवर गडगडला अन् भारतीय महिलांवर फॉलोऑनची नामुष्की ओढावली. महिला कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी 100+ धावांची भागीदारी होऊनही संपूर्ण संघ 231 धावाच करण्याची ही सर्वांत निचांक कामगिरी ठरली. ( India's 231 is the lowest total ever made after an opening partnership of 100+ in Women's Test cricket). इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 396 धावांवर पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरात शेफाली व स्मृती यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाला दमदार सुरूवात करून दिली. शेफालीचे पदार्पणातील शतक 4 धावांसाठी हुकले. तिनं 152 चेंडूंत 13 चौकार व 2 षटकारांसह 96 धावा केल्या. स्मृतीनं 155 चेंडूंत 14 चौकारांसह 78 धावा केल्या. 167 धावांवर भारतानं पहिली विकेट गमावली अन् त्यानंतर 64 धावांत संघाचा डाव गडगडला. भारतावर फॉलोऑनची नामुष्की ओढावली. दीप्ती शर्मानं 29 धावांचं योगदान दिलं. इंग्लंडच्या सोफी एस्क्लेस्टननं 4 विकेट्स घेतल्या.

 

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंड