ENGvPAK : सर्फराज अहमदनं धावबाद केलं, पण अपील करायला विसरला; जाणून घ्या कारण

इंग्लंडने चौथ्या वन डे सामन्यात 341 धावांचे लक्ष्य सहज पार करताना पाच सामन्यांची मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 13:02 IST2019-05-18T13:01:47+5:302019-05-18T13:02:13+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ENGvPAK : Tom Curran was run-out but not referred by the umpire and no appeal from Pakistani captain Sarfaraz Ahmed | ENGvPAK : सर्फराज अहमदनं धावबाद केलं, पण अपील करायला विसरला; जाणून घ्या कारण

ENGvPAK : सर्फराज अहमदनं धावबाद केलं, पण अपील करायला विसरला; जाणून घ्या कारण

नॉटिंगहॅम, इंग्लंड वि. पाकिस्तान : इंग्लंड दौऱ्यावरील पाकिस्तान संघाच्या लाजीरवाण्या पराभवाची मालिका चौथ्या सामन्यातही कायम राहीली. इंग्लंडने चौथ्या वन डे सामन्यात 341 धावांचे लक्ष्य सहज पार करताना पाच सामन्यांची मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. इंग्लंडने 3 विकेट व 3 चेंडू राखून हा सामना जिंकला. या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांना पुन्हा एकदा अपयश आल्याचे पाहायला मिळाले. शिवाय त्यांना गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटकाही बसला. या सामन्यात पाकिस्तानला कमबॅक करण्याची संधी होती, परंतु कर्णधार सर्फराज अहमदनं इंग्लंडच्या टॉम कुरणला धावबाद केल्यानंतही अपील केले नाही. त्यामुळे पाकिस्तानने विजयाची संधी गमावली.

पाकिस्तानच्या 340 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने तोडीततोड उत्तर दिले. जेसन रॉय ( 114), बेन स्टोक्स ( 71*),  जेम्स व्हिंस ( 43), जो रूट ( 36) आणि टॉम कुरण ( 31) यांनी इंग्लंडला विजय मिळवून दिला. पण, फलकावर 258 धावा असताना इंग्लंडचे सहा फलंदाज माघारी परतले होते. तेव्हा बेन स्टोक्स आणि टॉम कुरण यांच्यावरच संपूर्ण मदार होती. स्टोक्स फॉर्मात असल्याने चांगली फटकेबाजी करत होता, परंतु दुसऱ्या बाजूला असलेल्या कुरणला बाद करून सामन्यात चुरस निर्माण करण्याची रणनीती पाकिस्तानला आखता आली असती. तशी संधीही त्यांना मिळाली होती. 

स्टोक्स व कुरण या जोडीनं सातव्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी करून इंग्लंडला विजयपथावर आणले. पण, या भागीदारीत एकदा कुरण बाद होऊनही मैदानावर खेळत राहीला. चोरटी धाव घेताना पाकचा यष्टिरक्षक सर्फराजनं कुरणला धावबाद केले, त्याने बेल्सची उडवल्या. मात्र, त्यानं किंवा पाकिस्तानच्या एकाही खेळाडूनं पंचांकडे अपील केले नाही. त्यामुळे बाद असूनही कुरणला जीवदान मिळाले. त्यानंतर त्याने पाक गोलंदाजांची धुलाई केली. त्यानं 30 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीनं 31 धावा केल्या. याबाबत सर्फराजला विचारले असता तो म्हणाला,''कुरण क्रिजवर पोहोचण्यापूर्वीच मी बेल्स उडवल्या होत्या. त्यामुळे मला अपील करण्याची गरज वाटली नाही.'' 


ENGvPAK : पाकिस्तान करायला गेला पराक्रम, चार तासांत नोंदवला लाजीरवाणा विक्रम

ENGvPAK : शोएब मलिकनं करून घेतलं स्वतःचं हसं; गोलंदाजाचं काम झालं सोपं, पाहा कसं!

Web Title: ENGvPAK : Tom Curran was run-out but not referred by the umpire and no appeal from Pakistani captain Sarfaraz Ahmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.