Join us

इंग्लंडचे ५०० धावांचे लक्ष्य

इंग्लंडच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने सांगितले की, सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम बनवल्यानंतर आता त्यांच्या संघाचे लक्ष्य ५०० धावांचा विक्रम करण्याचे आहे.’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 04:07 IST

Open in App

नॉटिंघम : इंग्लंडच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने सांगितले की, सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम बनवल्यानंतर आता त्यांच्या संघाचे लक्ष्य ५०० धावांचा विक्रम करण्याचे आहे.’मॉर्गनच्या नेतृत्वात संघाने आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६ बाद ४८१ धावा करुन २४२ धावांनी विजय मिळवला. यासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली आहे. मॉर्गनने सांगितले, ‘मला वाटते की आम्ही पाचशे धावांच्या खूप जवळ होते. आम्ही चांगल्या स्थितीत होते. तेव्हा सहा षटके बाकी होते. आम्ही कल्पनादेखील केली नव्हती.’ (वृत्तसंस्था)