Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडची आॅस्ट्रेलियाविरुद्ध मुसंडी, कूकची शतकी खेळी, स्टुअर्ट ब्रॉडचे चार बळी

मेलबोर्न : सूर गवसताच अ‍ॅलिस्टर कूकने केलेली शतकी खेळी आणि वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्या चार बळींमुळे चौथ्या अ‍ॅशेस कसोटीच्या दुसºया दिवशी इंग्लंडने आॅस्ट्रेलियाविरुद्ध मुसंडी मारली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:09 IST

Open in App

मेलबोर्न : सूर गवसताच अ‍ॅलिस्टर कूकने केलेली शतकी खेळी आणि वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्या चार बळींमुळे चौथ्या अ‍ॅशेस कसोटीच्या दुसºया दिवशी इंग्लंडने आॅस्ट्रेलियाविरुद्ध मुसंडी मारली. मालिकेत ०-३ ने माघारताच अ‍ॅशेस गमविणाºया इंग्लंडने दोन गड्यांच्या मोबदल्यात १९२ धावा उभारल्या. कूकने गेल्या १० डावांतील अर्धशतकी खेळीचा दुष्काळ संपवीत नाबाद १०४ धावा ठोकून करियरमधील ३२ वे शतक साजरे केले. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार ज्यो रुट ४९ धावांवर नाबाद होता. कूकसोबत त्याने तिसºया गड्यासाठी नाबाद ११२ धावांची भागीदारी केली.मेलबोर्नच्या उकाड्यात इंग्लंडने आॅस्ट्रेलियाला पहिल्या डावांत ३२७ धावांत रोखले. ब्रॉडने ५१ धावांत चार गडी बाद केले. कूकला ६६ धावांवर जीवदान मिळाले. मिशेल मार्शच्या चेंडूवर प्रतिस्पर्धी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने त्याचा झेल सोडला. इंग्लंडकडून सलग ३४ वी आणि करियरमधील १५१ वी कसोटी खेळत असलेल्या कूकने सध्याच्या मालिकेत मागील सहा डावांत केवळ ८३ धावा केल्या होत्या. इंग्लंड संघ आॅस्ट्रेलियाच्या तुलनेत केवळ १३५ धावांनी मागे असून, त्यांचे आठ फलंदाज शिल्लक आहेत. नाथन लियोनने सलामीवीर मार्क स्टोनमॅन याला आपल्याच चेंडूवर झेलबाद केले. जोश हेजलवूडने जेम्ह विस (१७) याला पायचित केले.त्याआधी, कर्णधार स्टीव्ह स्मिथ सलग चौथ्या बॉक्सिंग डे कसोटी शतकापासून वंचित राहिला. तो ७६ धावा काढून बाद झाला. सध्याच्या मालिकेत त्याने ५०२ धावा केल्या आहेत. आज उपाहारानंतर आॅस्ट्रेलियाचा डाव संपला. (वृत्तसंस्था)>२०१९ मध्ये दिवस-रात्रीची कसोटी नाही : ईसीबीआॅस्ट्रेलिया २०१९ साली अ‍ॅशेस कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौरा करेल तेव्हा दिवस-रात्रीचा कसोटी सामना शक्य नसल्याचे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट(ईसीबी)बोर्डाने स्पष्ट केले आहे.ईसीबीचे सीईओ टॉम हॅरिसन म्हणाले,‘इंग्लंडच्या स्थानिक अ‍ॅशेस आयोजनात आम्ही गुलाबी चेंडूचा वापर करणार नाही, शिवाय दिवस- रात्रीचा सामना खेळविणार नाही. सध्याच्या मालिकेत दुसरा कसोटी सामना अ‍ॅडिलेड येथे दिवस-रात्रीचा खेळविण्यात आला.>संक्षिप्त धावफलकआॅस्ट्रेलिया पहिला डाव : ११९ षटकांत सर्वबाद ३२७ धावा (डेव्हिड वॉर्नर १०३, स्टीव्ह स्मिथ ७६, शॉन मार्श ६१, कॅमेरुन बेनक्रॉफ्ट २६, टिम पेन २४. ख्रिस ब्रॉड ४/५१, अ‍ॅण्डरसन ३/६१, व्होक्स २/७२, कुरेन १/६५.)इंग्लंड पहिला डाव : ५७ षटकांत दोन बाद १९२ धावा (अ‍ॅलिस्टर कूक खेळत आहे १०४, ज्यो रुट खेळत आहे ४९, मार्क स्टोनमॅन१५, जेम्स विस १७. हेजलवूड १/३९, लियोन १/४४.)

टॅग्स :क्रिकेट