Join us  

विश्वचषकापूर्वीच इंग्लंडच्या कर्णधारावर बंदी

सामन्याच्या मानधनापैकी ४० टक्के रक्कम मॉर्गनला दंड म्हणून द्यावी लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 5:21 PM

Open in App

ब्रिस्टॉल : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने दमदार विजय मिळवला. पाकिस्ताननेइंग्लंडपुढे विजयासाठी 358 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे आव्हान इंग्लंडने सहा विकेट्स राखून सहज पार केले. इंग्लंडच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी. पण या सामन्यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांना धक्का बसला. कारण इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनवर बंदी घालण्याचा निर्णय आयसीसीने घेतला.

 

पाकिस्तानविरुद्धचा सामना इंग्लंडने जिंकला. पण त्यांच्या गोलंदाजांना चांगलाच मार खावा लागला. त्याचबरोबर इंग्लंडच्या षटकांची गती कमी झाली. त्यामुळे मॉर्गनला दंड ठोठावण्यात आला आहे. सामन्याच्या मानधनापैकी ४० टक्के रक्कम मॉर्गनला दंड म्हणून द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर मॉर्गनवर एका सामन्याची बंदी घालण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तान संघाला धू धू धुतलेआगामी वर्ल्ड कप स्पर्धेत धावांचा धो धो पाऊस पडणार हे निश्चित आहे. सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील वन डे सामन्यांतील धावांतून त्याची प्रचिती येत आहे. पाकिस्तानने उभे केलेले 358 धावांचे लक्ष्य इंग्लंडच्या खेळाडूंनी 6 विकेट आणि 31 चेंडू राखून सहज पार केले. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये धावांचा रतीब रचणाऱ्या जॉनी बेअरस्टोची बॅट राष्ट्रीय संघाकडूनही चांगलीच तळपली. त्याच्या तुफानी खेळीला अन्य फलंदाजांची तोडीस तोड साथ मिळाली. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत यजमान इंग्लंडने 2-0 असी आघाडी घेतली आहे.पाकिस्तानचा हा वन डेतील सलग सातवा फराभव आहे आणि विशेष म्हणजे या सातही सामन्यांत त्यांच्या संघात एक शतकवीर राहिला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. इंग्लंडने या वर्षात तिसऱ्यांदा 350 हून अधिक लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा पराक्रम केला आहे.पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 358 धावांचा डोंगर उभा केला.  इमाम-उल-हक या सामन्यात चांगलाच खेळला. पाकिस्तानचे आघाडीचे फलंदाज माघारी गेले असतान इमामने धैर्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करत 151 धावांची खेळी साकारली. त्याने 131 चेंडूंत 16 चौकार व 1 षटकार खेचला. त्याला हॅरिस सोहैल ( 41) व आसीफ अली ( 52) यांची उत्तम साथ लाभली.पण, हे मोठे लक्ष्य इंग्लंडने सहज पार केले. जेसन रॉय आणि बेअरस्टो यांनी दीडशतकी भागीदारी करून देताना इंग्लंडला मजबूत पाया रचून दिला. रॉयने 55 चेंडूंत 8 चौकार व 4 षटकारांसह 76 धावांची खेळी केली. त्यानंतर बेअरस्टोनं पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 93 चेंडूंत 15 चौकार व 5 षटकार खेचत 128 धावा चोपल्या. त्याला जो रूट ( 43), बेन स्टोक्स ( 37) आणि मोईन अली ( 46*) यांची उत्तम साथ लाभली. इंग्लंडने 44.5 षटकांत 4 फलंदाज गमावून हे लक्ष्य पार केले.

टॅग्स :इंग्लंडपाकिस्तानवर्ल्ड कप २०१९