Join us

इंग्लंडला ७१ धावांची आघाडी, स्टोक्सची गोलंदाजीनंतर फलंदाजीतही निर्णायक कामगिरी

अष्टपैलू बेन स्टोक्सच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध तिसºया कसोटीमध्ये ७१ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:30 IST

Open in App

लंडन : अष्टपैलू बेन स्टोक्सच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध तिसºया कसोटीमध्ये ७१ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. स्टोक्सने पहिल्या डावात ६ बळी घेत विंडीजचा डाव १२३ धावांंमध्ये गुंडाळल्यानंतर फलंदाजीतही चमक दाखवताना ६० धावांची खेळी केली. स्टोक्सच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद १९४ धावा केल्या.विडिंजचा पहिला डाव स्वस्तात गुंडाळल्यानंतर इंग्लंडचा डावही गडगडला. अ‍ॅलिस्टर कूक (१०), मार्क स्टोनमन (१), टॉम वेस्टली (८) आणि कर्णधार जो रुट (१) झटपट बाद झाल्यानंतर स्टोक्सने ७४ चेंडूत १० चौकारांसह ६० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या जोरावरइंग्लंडने विंडीजविरुध्द आघाडी घेण्यात यश मिळवले. केमार रोचने (५/७२) भेदक मारा करताना इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. जेसन होल्डरनेही (४/५४) चांगला मारा केला.संक्षिप्त धावफलकवेस्ट इंडिज (पहिला डाव): सर्वबाद १२३. इंग्लंड (पहिला डाव) : ५२.५ षटकांत सर्वबाद १९४ (बेन स्टोंक्स ६०, स्टुअर्ट ब्रॉड ३८; केमार रोच ५/५३, जेसन होल्डर ४/५४).

टॅग्स :क्रिकेटइंग्लंड