Join us  

युजवेंद्र चहलची इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूनं घेतली फिरकी; म्हणते तू माझ्यापेक्षा 'लहान'!

पहिल्या वन डेत भारताचे 288 धावांचे लक्ष्य विंडीजनं 8 विकेट राखून सहज पार केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 7:01 PM

Open in App

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पाहुण्यांनी बाजी मारली. शिमरोन हेटमायर आणि शे होप यांच्या शतकी खेळीनं भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. भारताचे 288 धावांचे लक्ष्य विंडीजनं 8 विकेट राखून सहज पार केले. तीन सामन्यांच्या मालिकेत विंडीजनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना उद्या विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. मालिकेत कमबॅक करण्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी कसून सराव केला. या सराव सत्रात जसप्रीत बुमराहनं सहभाग घेतला. पण, टीम इंडियातील फिरकीपटू युजवेंद्र चहल चर्चेत आला. इंग्लंडच्या डॅनिएल वॅटनं त्याची सोशल मीडियावर चांगलीच फिरकी घेतली. 

टीम इंडियाच्या खेळाडूंचं फोटोशूट नुकतच पार पडलं. युजवेंद्रनं सहकारी कुलदीप यादवसोबत एक फोटो शेअर केला. त्याच्यावरून इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूनं त्याला ट्रोल केले. त्यावर वॅटनं युजवेंद्रला तू माझ्यापेक्षा लहान आहेस, असं ट्रोल केले. 

चहलनं अजून तिला रिप्लाय दिलेलं नाही.  

RCBच्या फॅन्ससाठी विराट कोहलीचा खास संदेश, पाहा Videoइंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला लिलाव होणार आहे. या लिलावासाठी 971 खेळाडूंनी नावांची नोंदणी केली होती, परंतु आठ संघांनी छाननी केल्यानंतर केवळ 332 खेळाडू लिलावाला सामोरे जाणार आहेत. या यादित 186 भारतीय, 143 परदेशी आणि 3 संलग्न देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) कर्णधार विराट कोहलीनं चाहत्यांसाठी खास संदेश पाठवला आहे.   त्यात त्यानं म्हटलं आहे की,''RCBच्या चाहत्यांना हॅलो.. तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम दिले. पुढील मोसमासाठी गुरुवारी लिलाव होणार आहे, हे तुम्हाला माहितच आहे आणि त्यातही तुम्ही संघाच्या पाठीशी राहा, अशी माझी इच्छा आहे. संघ व्यवस्थापन, माइक आणि सिमोन त्यांचे काम चोख बजावत आहेत. संघबांधणीसाठी आम्ही काही चर्चा केली आहे. त्यामुळे संघातील कमकुवत बाबी दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 2020च्या सत्रात तगडा संघ घेऊन मैदानावर उतरायचे आहे.'' RCBनं 13 खेळाडूंना कायम राखले आणि त्यात दोन परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आता त्यांच्याकडे 27.90 कोटी रुपये आहेत आणि त्यात त्यांना 12 खेळाडू आपल्या ताफ्यात घ्यायचे आहेत.  

टॅग्स :युजवेंद्र चहलभारत विरुद्ध वेस्ट इंडिजइंग्लंड