मोठी बातमी; इंग्लंडच्या ताफ्यातील ७ जणांना झाला कोरोना, संपूर्ण संघाला जावं लागलं विलगिकरणात

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी मोठी बातमी समोर येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 02:15 PM2021-07-06T14:15:15+5:302021-07-06T14:19:47+5:30

whatsapp join usJoin us
England vs Pakistan: Covid-19 creates havoc in England squad ahead of Pakistan series, 7 England squad members test positive | मोठी बातमी; इंग्लंडच्या ताफ्यातील ७ जणांना झाला कोरोना, संपूर्ण संघाला जावं लागलं विलगिकरणात

मोठी बातमी; इंग्लंडच्या ताफ्यातील ७ जणांना झाला कोरोना, संपूर्ण संघाला जावं लागलं विलगिकरणात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी मोठी बातमी समोर येत आहे. इंग्लंडच्या ताफ्यातील सात सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. यामध्ये तीन खेळाडू व व्यवस्थापकीय टीममधील चार खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंच्या संपर्कात इतरही खेळाडू आले आहेत. इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डानं ( ECB) याबाबतचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सदस्यांना लंडन सरकारच्या नियमानुसार विलगिकरणात जावे लागणार आहे. इतर सदस्यही विलगिकरणात असणार आहे. पण, तरीही वन डे व ट्वेंटी-२० मालिका होणार असल्याचे ECBने जाहीर केले. बेन स्टोक्स याचे संघात पुनरागमन झाले आहे आणि तो संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. 

८ तारखेपासून वन डे मालिकेला सुरुवात होणार असून १० व १३ जुलैला दुसरा व तिसरा वन डे सामना होणार आहे. त्यानंतर १६, १८ व २० जुलैला ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात येतील. या मालिकेसाठी इंग्लंडनं वन डे संघ जाहीर केला होता. पण, आता सर्व खेळाडूंना विलगिकरणात जावे लागल्यानं ECB पुन्हा नवी टीम जाहीर करणार आहे आणि त्याचे नेतृत्व बेन स्टोक्स सांभाळणार आहे.

आधी जाहीर केलेला संघ - इयॉन मॉर्गन ( कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, टॉम बँटन, सॅम बिलिंग, सॅम कुरन, टॉम कुरन, लाएम डॉसन, जॉर्ज गार्टन, लाएम लिव्हिंगस्टोन, डेवीड मलान, आदील राशिद, जो रूट, जेसन रॉय, डेव्हिड विली, ख्रिस वॉक्स, मार्क वूड, जोस बटलर, 

Read in English

Web Title: England vs Pakistan: Covid-19 creates havoc in England squad ahead of Pakistan series, 7 England squad members test positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.