Join us  

दुसरी कसोटी: इंग्लंडविरुद्ध पाकची आव्हानात्मक मजल

पहिल्या डावात ९ बाद २२३ धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 1:13 AM

Open in App

साऊथम्पन : मोहम्मद रिझवानच्या (नाबाद ६०) अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात शुक्रवारी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला तोपर्यंत पाकिस्तानने ९ बाद २२३ धावांची आव्हानात्मक मजल मारली होती. इंग्लंडतर्फे अँडरसन व ब्रॉडने प्रत्येकी तीन बळी घेतले.पाकतर्फे आबिद अलीने ६० धावांची खेळी केल्यानंतर आजमने ४७ धावा फटकावल्या. रिझवानने तळाच्या फलंदाजांच्या साथीने उपयुक्त योगदान दिल्यामुळे पाकिस्तानला दोनशेचा पल्ला ओलांडता आला.(वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :पाक ८६ षटकांत ९ बाद २२३ (आबिद अली ६०, बाबर आझम ४७, मोहम्मद रिझवान नाबाद ६०, अँडरसन व ब्रॉड प्रत्येकी ३ बळी).