Join us  

इंग्लंडचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय; तीन गडी राखून मात

इंग्लंडची मालिकेत १-० ने आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 11:44 PM

Open in App

मॅन्चेस्टर : वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सच्या १२० चेंडूतील नाबाद ८४ आणि यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलरच्या (७५) शानदार अर्धशतकांमुळे अत्यंत रोमहर्षक आणि तेवढ्याच उत्कंठापूर्ण ठरलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने चौथ्या दिवशीच शनिवारी पाकिस्तानचा तीन गडी राखून पराभव केला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.पहिल्या डावात १०७ धावांची आघाडी घेणाऱ्या पाकिस्तानचा दुसरा डाव कोलमडल्याने त्यांना सामन्यावरील पकड गमवावी लागली. विजयाचे हिरो बटलर-वोक्स यांनी व्यावसायिक वृत्तीचा परिचय देत सहाव्या गड्यासाठी १३९ धावांची दमदार भागीदारी केली. त्याआधी पाक गोलंदाजांनी इंग्लंडचा अर्धा संघ १२५ धावात गारद करीत सामना आपल्याकडे झुकवला होता. तथापि बटलर-वोक्स यांनी गोलंदाजांना कुठलीही संधी न देता वेगवान धावा काढल्या. इंग्लंडने ८२.१ षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात विजयावर शिक्कामोर्तब केले.संक्षिप्त धावफलकपाकिस्तान पहिला डाव : ३२६ इंग्लंड पहिला डाव : २१९, पाकिस्तान दुसरा डाव : ४६.४षटकात सर्वबाद १६९ धावा. इंग्लंड दुसरा डाव (विजयासाठी २७७ धावांचे लक्ष्य) : ८२.१ षटकात ७ बाद २७७ (वोक्स नाबाद ८४, जोस बटलर ७५, ज्यो रुट ४२, डोम सिबले ३६). गोलंदाजी: यासिर शाह ४/९९, मोहम्मद अब्बास १/३६, शाहीन आफ्रिदी १/६१, नसीम शाह १/४५.