IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!

Ravindra Jadeja: एजबॅस्टन कसोटी सामन्यात रवींद्र जाडेजाकडे इतिहास रचण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:35 IST2025-07-04T14:33:41+5:302025-07-04T14:35:32+5:30

whatsapp join usJoin us
England vs India, 2nd Test: Ravindra Jadeja has chance to make history | IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!

IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

एजबॅस्टन कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी उल्लेखनीय फलंदाजी केली. या सामन्यातील पहिल्या डावात भारताने ५८७ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक २६९ धावा केल्या. तर, सलामीवर यशस्वी जैस्वालने ८७ धावा आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने ८९ धावांचे मोलाचे योगदान दिले. यानंतर रवींद्र जाडेजाकडे इतिहास रचण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 

एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा डावाची सुरुवात झाली, तेव्हा भारताचा युवा गोलंदाज आकाश दीपने त्याच्या दुसऱ्या षटकात सलग दोन चेंडूत इंग्लंडच्या दोन फलंदाजांना माघारी धाडले.त्यानंतर मोहम्मद सिराजने जॅक काउलीच्या रुपात भारताला तिसरे यश मिळवून दिले. आता फलंदाजीने चमत्कार करणाऱ्या रवींद्र जाडेजाकडे इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज बॉब विलिसचा विक्रम मोडण्याची संधी आहे. 

रवींद्र जडेजाने ८१ कसोटी सामन्यांमध्ये ३२४ विकेट्स घेतल्या आहेत. एजबॅस्टन सामन्यात त्याने आणखी दोन विकेट्स घेतल्यास तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत बॉब विलिसला मागे टाकेल. बॉब विलिसने ९० कसोटी सामन्यांमध्ये ३२५ विकेट्स घेतले असून १६ वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत जडेजा हा पाचवा क्रमांक आहे. अनिल कुंबळे, आर. अश्विन, कपिल देव आणि हरभजन सिंग यांनी भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतले आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय
अनिल कुंबले- ६१९ विकेट्स
आर अश्विन- ५३७ विकेट्स
कपिल देव- ४३४ विकेट्स
हरभजन सिंह- ४१७ विकेट्स
रवींद्र जडेजा- ३२४ विकेट्स

Web Title: England vs India, 2nd Test: Ravindra Jadeja has chance to make history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.