सामन्यापूर्वी ३ खेळाडू पडले आजारी; १०व्या क्रमांकावरील फलंदाज आला ओपनिंगला अन् शतकी खेळी करून रचला इतिहास

कसोटी क्रिकेट खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि त्यात पदार्पणात दमदार कामगिरीचा प्रत्येकाचा निर्धार असतो.

By स्वदेश घाणेकर | Published: February 12, 2021 03:04 PM2021-02-12T15:04:08+5:302021-02-12T15:04:44+5:30

whatsapp join usJoin us
England cricketer billy griffith debut today smash historic century against west indies in 1948 | सामन्यापूर्वी ३ खेळाडू पडले आजारी; १०व्या क्रमांकावरील फलंदाज आला ओपनिंगला अन् शतकी खेळी करून रचला इतिहास

सामन्यापूर्वी ३ खेळाडू पडले आजारी; १०व्या क्रमांकावरील फलंदाज आला ओपनिंगला अन् शतकी खेळी करून रचला इतिहास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

११ फेब्रुवारीला १९४८ साली अशाच एका खेळाडूचं कसोटी पदार्पण गाजलं होतं. त्यानं कसोटी पदार्पण अविस्मरणीय बनवलं. इंग्लंडच्या बिली ग्रिफिथ ( Billy Griffith) यांच्याबाबत आपण बोलत आहोत... त्यांना वेस्ट इंडिजच्या घातकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी सलामीला यावं लागलं.  बिली ग्रिफिथ यांच्या कसोटी पदार्पणाची स्टोरी रोमहर्षक आहे. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ११ ते १६ फेब्रुवारीला हा सामना खेळला गेला.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १० Sexiest खेळाडूंमध्ये पाच भारतीय; शेवटचं नाव पाहून बसेल आश्चर्याचा धक्का!

या सामन्यापूर्वी इंग्लंडचे तीन फलंदाज अचानक आजारी पडले आणि सर्वांची नजर बिली ग्रिफिथ यांच्याकडे वळली. ग्रिफिथ हे सलामीला आहे आमइ त्यांनी १४० धावांची वादळी खेळी करून सर्वांना आश्चर्यचकीत केलं. कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारे ते इंग्लंडचे पहिले क्रिकेटपटू ठरले. दुसऱ्या डावात ते चार धावांवर माघारी परतले. उर्वरित दोन कसोटी सामन्यांत बिली ग्रिफिथ आठव्या व दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आले. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३६२ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनं ४९७ धावा चोपल्या. दुसऱ्या डावात इंग्लंडला २७५ धावा करता आल्या आणि वेस्ट इंडिजनं ३ बाद ७२ धावा करताना सामना ड्रॉ राखला. लाज वाटायला हवी; भारतीय खेळाडूच्या आजीचं निधन अन् नेटिझन्सकडून वर्णद्वेषी टीका!


 

ग्रिफिथ यांनी ३ कसोटी क्रिकेट सामन्यांत ५ डावांमध्ये ३१.४० च्या सरासरीनं १५७ धावा केल्या. त्यानं २१५ प्रथम श्रेणी सामन्यांत ४८४६ धावा केल्या आणि त्यात ३ शतकं व १५ अर्धशतकं झळकावली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी ३२८ झेल घेतले आणि यष्टिंमागे ८० झेल घेतले.  IPL 2021 Acution list : अर्जुन तेंडुलकरच्या नावाला होकार, पण एस श्रीसंत याला नकार; जाणून घ्या नेमका प्रकार!

Web Title: England cricketer billy griffith debut today smash historic century against west indies in 1948

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.