Join us  

IPLच्या सर्वात महागड्या खेळाडूला उड्डाण करण्यापासून रोखले; एअरलाइन्सने सांगितलं हास्यास्पद कारण

Sam Curran IPL 2023: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन सध्या खूप चर्चेत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 11:56 AM

Open in App

नवी दिल्ली : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच पार पडलेल्या आयपीएलच्या मिनी लिलावात त्याच्यावर पैशांचा वर्षाव झाला. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. यामुळे तो चर्चेत असतानाच एअरलाइन्सने त्याला उड्डाण करण्यापासून रोखले, यामुळे देखील त्याने सर्वांचे लक्ष वेधले. सॅम करनने सोशल मीडियाच्या माध्यमातून उड्डाण करण्यापासून रोखल्याची माहिती दिली. तसेच एखाद्याला उड्डाण करण्यापासून रोखण्याचे ठोस कारण असते. मात्र, एअरलाइन्सने सॅम करनला दिलेले कारण केवळ अनोखेच नाही तर हास्यास्पद होते. 

सॅम करनला उड्डाण करण्यापासून रोखलेव्हर्जिन एअरलाइन्सने इंग्लंडच्या स्टार अष्टपैलू खेळाडूला उड्डाण करण्यापासून रोखल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे. खरं तर एअरलाइन्सने दिलेले कारण ऐकून सर्वांनाच हसू येईल. एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, सॅम करनने बुक केलेली सीट तुटलेली होती, त्यामुळे तो प्रवास करू शकला नाही. सॅम करणने आपल्या ट्विटमध्ये या हास्यास्पद कारणाची माहिती दिली. हे आश्चर्यकारक आणि अपमानास्पद असल्याचेही त्याने म्हटले आहे.

सॅम करन ठरला सर्वात महागडा खेळाडूआयपीएलच्या मिनी लिलावात पंजाब किंग्जच्या फ्रँचायझीने सॅम करनला 18.50 कोटी रूपयांमध्ये खरेदी केले. लक्षणीय बाब म्हणजे सॅम करन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 

आयपीएलमध्ये सर्वाधिक रक्कम मिळालेले खेळाडू...

  • सॅम करन - पंजाब किंग्ज - 18.50 कोटी (2023)
  • कॅमेरून ग्रीन - मुंबई इंडियन्स - 17.50 कोटी (2023)  
  • विराट कोहली - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 17 कोटी (2018-2021)
  • लोकेश राहुल - लखनौ सुपर जायंट्स - 17 कोटी (2022)
  • ख्रिस मॉरिस - राजस्थान रॉयल्स- 16.25 कोटी (2021)
  • युवराज सिंग - दिल्ली डेअरडेव्हिल्स - 16 कोटी (2015) 
  • रोहित शर्मा - मुंबई इंडियन्स - 16 कोटी (2022) 
  • रिषभ पंत - दिल्ली कॅपिटल्स - 16 कोटी (2022) 
  • रवींद्र जडेजा - चेन्नई सुपर किंग्स - 16 कोटी (2022)
  • पॅट कमिन्स - कोलकाता नाईट रायडर्स - 15.5 कोटी (2020)
  • ईशान किशन - मुंबई इंडियन्स - 15.25 कोटी (2022)
  • राशिद खान - गुजरात टायटन्स - 15 कोटी (2022) 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :सॅम कुरेनइंग्लंडआयपीएल २०२२आयपीएल लिलावपंजाब किंग्स
Open in App