ENG-W vs IND-W 1st T20 : जबरदस्त, लय भारी!; भारताच्या हर्लीन देओलनं टिपला अफलातून झेल, भज्जी म्हणतो... Video

ENG-W vs IND-W 1st T20 : Harleen Deol भारताच्या हर्लीन देओलनं शुक्रवारी इंग्लंड महिला संघाविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात अफलातून झेल घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 10:25 AM2021-07-10T10:25:20+5:302021-07-10T10:34:12+5:30

whatsapp join usJoin us
ENG-W vs IND-W 1st T20 : Harleen Deol takes the catch of a lifetime at boundary edge to dismiss Amy Ellen Jones | ENG-W vs IND-W 1st T20 : जबरदस्त, लय भारी!; भारताच्या हर्लीन देओलनं टिपला अफलातून झेल, भज्जी म्हणतो... Video

ENG-W vs IND-W 1st T20 : जबरदस्त, लय भारी!; भारताच्या हर्लीन देओलनं टिपला अफलातून झेल, भज्जी म्हणतो... Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताच्या हर्लीन देओलनं शुक्रवारी इंग्लंड महिला संघाविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात अफलातून झेल घेतला. क्षेत्ररक्षणात चपळता अन् समय सूचकतेचं उदाहरण हर्लीन देओलनं दाखवून देताना इंग्लंडच्या अॅमी जोन्सला तंबूत जाण्यास भाग पाडले. सोशल मीडियावर सध्या हर्लीननं घेतलेल्या कॅचचीच चर्चा सुरू आहे आणि टर्बोनेटर हरभजन सिंग याच्यासह अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. ( Harleen Deol takes the catch of a lifetime at boundary edge to dismiss Amy Ellen Jones) 

सीमारेषेबाहेर जाणाऱ्या चेंडूवर झेप घेणे अन् चतुराईनं तो टिपून संघाला एक यश मिळवूण देणे, हे सर्वांनाच जमते असे नाही. पण, हर्लीननं ते करून दाखवलं.  शिखा पांडेच्या गोलंदाजीरवर भारतासाठी डोईजड झालेल्या अॅनी जोन्सनं सुरेख फटका मारला, पण सीमारेषेवर उभ्या असलेल्या हर्लीननं तो चेंडू टिपला. तोल सीमारेषेबाहेर जात असल्याचे समजताच तिनं चेंडू पुन्हा हवेत फेकला अन् सीमारेषेबाहेरून हवेत झेप घेत पुन्हा तो झेलला. तिच्या या कॅचचं अनेकांनी कौतुक केलंच, शिवाय प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या खेळाडूंनी टाळ्या बाजवल्या. जोन्स २६ चेंडूंत ४३ धावांवर माघारी परतली.   

सौदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींवरही भारी पडतेय भारतीय क्रिकेटपटू, १३ वर्षांची असताना सोडलं होतं घर!




इंग्लंडच्या महिला संघानं २० षटकांत ७ बाद १७७ धावा केल्या. नॅट शिव्हर ( ५५), जोन्स ( ४३) व डॅनी वॅट ( ३१) यांनी संघाच्या धावसंख्येत हातभार लावला. भारताकडून शिखा पांडेनं २२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारतानं ८.४ षटकांत ३ बाद ५४ धावा केल्या होत्या आणि पावसामुळे खेळ रद्द करावा लागला. डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडला १८ धावांनी विजयी घोषित करण्यात आले. 
 

Web Title: ENG-W vs IND-W 1st T20 : Harleen Deol takes the catch of a lifetime at boundary edge to dismiss Amy Ellen Jones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.