Join us  

ENG vs SA Test : Stuart Broad हवेत झेपावला, एका हाताने अफलातून कॅच घेतला; दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळला, Video 

England vs South Africa Test : इंग्लंड-दक्षिण आफ्रिका यांच्यातली लॉर्ड्स कसोटी नाट्यमय वळणावर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 5:09 PM

Open in App

England vs South Africa Test : इंग्लंड-दक्षिण आफ्रिका यांच्यातली लॉर्ड्स कसोटी नाट्यमय वळणावर आली आहे. एक दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर कागिसो रबाडाच्या भेदक गोलंदाजीने यजमानांचा पहिला डाव १६५ धावांवर गडगडला. प्रत्युत्तरात आफ्रिकेने दमदार खेळ करताना पहिल्या डावात १६१ धावांची आघाडी घेतली. बेन स्टोक्स ( ३-७१), स्टुअर्ट ब्रॉड ( ३-७१) व मॅथ्यू पॉट्स ( २-७९) यांनी चांगली गोलंदाजी केली. पण, आफ्रिकेच्या डावात चर्चेत राहिला तो इंग्लंडचा महान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड ( Stuart Broad) त्याने लॉर्ड्सवर १०० विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाच, शिवाय एक अफलातून झेलही टिपला.

इंग्लंडकडून पहिल्या डावात ऑली पोपने ( ७३) सर्वाधिक धावा केल्या. त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स ( २०) हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. कागिसो रबाडाने ५२ धावांत ५ विकेट्स घेतल्या. मार्को येनसन ( २-३०) व एनरिच नॉर्खिया ( ३-६३)  यांनी त्याला उत्तम साथ दिली. आफ्रिकेचे सलामीवीर डीन एल्गर ( ४७) व सॅरेल एर्वी ( ७३) यांनी दमदार सुरूवात करून दिली. मधल्या फळीत थोडी गडबड झाली. किगन पीटरसन ( २४), एडन मार्कराम ( १६) व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( १९) हे झटपट माघारी परतले. मार्को येनसेनने ४८ धावांची खेळी केली, तर केशव महाराजने ४१ धावा केल्या.

कागिसो रबाडाने ७८व्या षटकात मॅथ्यू पॉट्सच्या गोलंदाजीवर खणखणीत फटका मारला, परंतु ब्रॉडने हवेत झेपावून एका हाताने अप्रतिम झेल टिपला. आफ्रिकेची अखेरची विकेटही अफलातून कॅच घेऊनच माघारी परतली. आफ्रिकेचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला. 

टॅग्स :स्टुअर्ट ब्रॉडइंग्लंडद. आफ्रिका
Open in App