Trent Boult , ENG vs NZ 3rd Test : ६ बाद ५५ धावा! ट्रेंट बोल्टच्या वेगासमोर इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले, निल वॅगनरनेही धक्के दिले

 डॅरिल मिचेल व टॉम ब्लंडल यांनी २४१ चेंडूंत १२० धावांची भागीदारी केली. डॅरिल २२८ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १०९ धावांवर बाद झाला. किवींचा पहिला डाव ३२९ धावांवर गडगडला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 08:38 PM2022-06-24T20:38:08+5:302022-06-24T20:39:03+5:30

whatsapp join usJoin us
ENG vs NZ 3rd Test : Trent Boult picking 3 wickets, Neil Wagner picking 2 wickets in the first 5 balls & England 55 for 6 | Trent Boult , ENG vs NZ 3rd Test : ६ बाद ५५ धावा! ट्रेंट बोल्टच्या वेगासमोर इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले, निल वॅगनरनेही धक्के दिले

Trent Boult , ENG vs NZ 3rd Test : ६ बाद ५५ धावा! ट्रेंट बोल्टच्या वेगासमोर इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले, निल वॅगनरनेही धक्के दिले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 ENG vs NZ 3rd Test : टॉम ब्लंडल व डॅरिल मिचेल या जोडीनं पुन्हा एकदा न्यूझीलंडला सावरले आणि ५ बाद १२३ धावसंख्येवरून संघाला ३२९ धावांपर्यंत पोहोचवले. इंग्लंडकडून दमदार खेळ पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु नव्या चेंडूवर ट्रेंट बोल्टने ( Trent Boult) कमाल केली. त्याने इंग्लंडची आघाडीची फळी नेस्तानाबुत केली आणि ८ षटकांत ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता पाहावा लागला. त्यानंतर निल वॅगनरने दोन झटके दिले. 

टॉम लॅथम ( ०), विल यंग ( २०), केन ( ३१), डेव्हॉन कॉनवे ( २६) व हेन्री निकोल्स ( १९) हे १२३ धावांवर माघारी परतले.  डॅरिल मिचेल व टॉम ब्लंडल यांनी २४१ चेंडूंत १२० धावांची भागीदारी केली. ब्लंडलने १२२ चेंडूंत ७ चौकारांसह ५५ धावा केल्या. त्यानंतर मिचेल ब्रेसवेल ( १३ ) व टीम साऊदी ( ३३) यांनी डॅरिलला साथ मिळाली. डॅरिल २२८ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १०९ धावांवर बाद झाला. किवींचा पहिला डाव ३२९ धावांवर गडगडला. 

इंग्लंडविरुद्घच्या मालिकेतील हे त्याचे तिसरे शतक ठरले आणि पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या फलंदाजाने इंग्लंडविरुद्ध सलग तीन शतकं झळकावली. या मालिकेत डॅरिलने 13(35), 108(203), 190(318), 62*(131) व 109(228) अशी धावसंख्या केली आहे. इंग्लंडविरुद्ध एका मालिकेत किवींकडून सर्वाधिक ४६३* धावा करण्याचा पराक्रम डॅरिलने नावाव र केला. यापूर्वी १९४९ मध्ये मार्टिन डोनेल्ली यांनी ४ सामन्यांत ४६२ धावा केल्या होत्या. 

प्रत्युत्तरात इंग्लंडला ट्रेंट बोल्टने हादरे दिले. पहिल्या ८ षटकांत इंग्लंडची अवस्था ४ बाद २३ अशी झाली आणि त्यात बोल्टने तीन विकेट्स घेतल्या.  अॅलेक्स लीस ( ४), झॅक क्रॅवली ( ६), ओली पोप ( ५), जो रूट ( ५) हे झटपट माघारी गेल्यानंतर जॉनी बेअरस्टो व कर्णधार बेन स्टोक्स यांनी थोडा डाव सावरला. स्टोक्सने मारलेला १ षटकार विक्रमी ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये षटकारांचे शतक पूर्ण करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. तिसऱ्या कसोटीत संधी मिळालेल्या निल वॅगनरने त्याची ( १८) आणि बेन फोक्स ( ०) यांची विकेट घेतली. इंग्लंडची अवस्था ६ बाद ५५ झाली.

Web Title: ENG vs NZ 3rd Test : Trent Boult picking 3 wickets, Neil Wagner picking 2 wickets in the first 5 balls & England 55 for 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.