ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

पुन्हा जसप्रीत बुमराहच ठरला भारी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 20:56 IST2025-06-22T20:46:24+5:302025-06-22T20:56:20+5:30

whatsapp join usJoin us
ENG vs IND 1st Test Day 3 England All Out 465 Runs After Brook Falls For 99 Jasprit Bumrah Picks Five Wicket Haul | ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ENG vs IND 1st Test Day 3 England 1st Innings 465 Bumrah Picks Five Wicket Haul  : जसप्रीत बुमराहनं भेदक माऱ्यासह इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत धाडत टीम इंडियाला ६ धावांची अल्प आघाडी मिळवून दिली आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्यावर यजमान इंग्लंड संघाचा पहिला डाव ४६५ धावांत आटोपला आहे. जर भारतीय संघाने क्षेत्ररक्षणा वेळी चुका केल्या नसत्या तर इंग्लंडच्या संघाला ३५० धावांपर्यंतही मजल मारता आली नसती. कारण बेन डकेट, हॅरी ब्रूक आणि ओली पोप यांनी झेल सुटल्यावर मोठी खेळी केली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

तीन चुका अन् टीम इंडियानं गमावली मोठी आघाडी मिळवण्याची संधी 

इंग्लंडकडून ओली पोप याने शतकी खेळी केली. ६० धावांवर खेळत असताना जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर यशस्वी जैस्वालनं त्याचा झेल सोडला होता. या संधीच सोन करताना त्याने १०६ धावांची खेळी केली. जी इंग्लंडच्या ताफ्यातील कोणत्याही खेळाडूनं पहिल्या डावात केलेली सर्वोच्च खेळी ठरली. याआधी बुमराहच्या गोलंदाजीवर यशस्वी जैस्वालनं बेन डकेट याचा ११ धावांवर झेल सोडला. त्याने ६२ धावांचे योगदान दिले. हॅरी ब्रूक हा ९९ धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजाने ४६ धावांवर त्याचाही झेल सोडला होता.  या ३ चुकांमुळे टीम इंडियानं लीड्स येथील हेडिंग्ले कसोटीत मोठी आघाडी मिळवण्याची संधी गमावली.    

DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

जसप्रीत बुमराहच ठरला भारी! 

जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या दिवसाच्या खेळात इंग्लंडला तीन धक्के दिले होते. तिसऱ्या दिवसाच्या खेळात प्रसिद्ध कृष्णानं ३ विकेट्स घेतल्या. पण त्याच्यासाठी त्याने खूप धावाही खर्च केल्या. २७ षटकात त्याने १२२ धावा दिल्याचे पाहायला मिळाले. १८ षटकानंतर पहिली विकेट मिळवणाऱ्या मोहम्मद सिराजनं २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. क्रिेस वोक्स आणि जोश टंग या अखेरच्या दोन विकेट्स घेत जसप्रीत बुमराहनं पाच विकेट्सचा डाव साधला. परदेशी मैदानात १२ व्या वेळी बुमराहने ही कामगिरी करून दाखवली आहे.

Web Title: ENG vs IND 1st Test Day 3 England All Out 465 Runs After Brook Falls For 99 Jasprit Bumrah Picks Five Wicket Haul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.