Join us

Eliminator, SRH vs RCB : Ohhh No... दुसऱ्याच षटकात विराट कोहली OUT; जेसन होल्डरनं दिले दोन धक्के, Video

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात आज एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) असा सामना रंगत आहे. SRHनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

By स्वदेश घाणेकर | Updated: November 6, 2020 19:51 IST

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात आज एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) असा सामना रंगत आहे. SRHनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेत संथ सुरुवातीनंतर दुसऱ्या टप्प्यात चमकदार कामगिरी करत SRHने गुणतालिकेत RCBपेक्षा वरचे तिसरे स्थान पटकावत प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले. स्पर्धेच्या साखळी फेरीतील अखेरच्या  टप्प्यात उभय संघांची कामगिरी परस्पर विरोधी राहिली. RCB सलग चार सामने गमावत गुणतालिकेत चौथ्या स्थानी राहिला तर SRHने विजयाची हॅटट्रिक साजरी केली.   SRHच्या कमबॅकमध्ये मोलाचा वाटा असलेल्या वृद्धीमान साहाला आजच्या सामन्यात दुखापतीमुळे मुकावे लागत आहे. साहाने ४ सामन्यांत २१४ धावा फटकावत सुरुवातीच्या लढतीत त्याला न खेळविणे ही संघ व्यवस्थापनाची चूक असल्याचे सिद्ध केले आहे. वॉर्नर व साहा यांच्या कामगिरीमुळे मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियम गर्ग आणि जेसन होल्डर यांच्यासारख्या खेळाडूंना विशेष काही करावे लागले नाही. पण, आज त्यांचा कस लागेल हे निश्चित. साहाच्या जागी श्रीवत्स गोस्वामीला संधी मिळाली आहे. दुसरीकडे RCBच्या ताफ्यातही तीन बदल पाहायला मिळत आहेत. ९ सामन्यांत ११ विकेट्स व ३४ धावा करणारा ख्रिस मॉरिस आजच्या सामन्याला दुखापतीमुळे मुकला आहे. 

आरोन फिंच संघात असतानाही विराट कोहलीनं RCBसाठी देवदत्त पडीक्कलसह सलामीला येण्याचा निर्णय घेतला. त्याला बाद करण्यासाठी डेव्हिड वॉर्नरनं पहिले षटक संदीप शर्माच्या हाती सोपवलं. संदीपनं IPLमध्ये सर्वाधिक ७ वेळा विराटला बाद केले आहे. विराटही आज त्याचा अभ्यास करून आला होता.पण, विराटसाठी जेसन होल्डरचा पेपर अवघड ठरला. होल्डरनं दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराटला ( ६) बाद केले. वाईड जाणाऱ्या चेंडूला छेडणं विराटला महागात पडलं. होल्डरनं देवदत्त पडीक्कललाही ( १) माघारी पाठवले.

पाहा व्हिडीओ...

 

- वृद्धीमान साहा दुखापतीमुळे संघाबाहेर, श्रीवत्स गोस्वामीला संधी- सनरायझर्स हैदराबाद - डेव्हिड वॉर्नर, श्रीवत्स गोस्वामी, मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियम गर्ग, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, शाहबाज नदीम, संदीप शर्मा, टी नटराजन-  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात तीन बदल; IN - आरोन फिंच, अॅडम झम्पा, नवदीप सैनी, OUT - ख्रिस मॉरिस ( दुखापतग्रस्त), जोश फिलिफ, शाहबाज अहमद- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - देवदत्त पडीक्कल, आरोन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शिवम दुबे, मोईन अली, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, अॅडम झम्पा, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल 

टॅग्स :IPL 2020विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबाद