Join us  

आठ चौकार, नऊ षटकार; अफगाणिस्तानच्या फलंदाजाचं पदार्पणातच झंझावाती शतक, मोडला अनेक दिग्गजांचा विक्रम

Rahmanullah Gurbaz : अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज याने आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना झंझावाती फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे.

By बाळकृष्ण परब | Published: January 21, 2021 6:55 PM

Open in App
ठळक मुद्देसलामीला फलंदाजीसाठी आलेल्या गुरबाज याने आयर्लंडविरुद्ध १२७ चेंडून १२७ धावांची खेळी केलीया खेळीसोबतच गुरबाज हा अफगाणिस्तानकडून एकदिवसीय क्रिकेटमधील पदार्पणात सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरलात्याने फटकावलेल्या १२७ धावा ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये कुठल्याही फलंदाजाने पदार्पणात केलेली दुसरी सर्वात मोठी खेळी ठरली आहे

नवी दिल्ली - अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज याने आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना झंझावाती फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. गुरबाज याने आठ चौकार आणि नऊ उत्तुंग षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. पदार्पणातील सामन्यातच १२७ धावांची खेळी करत रहमानुल्लाह गुरबाज याने अनेक दिग्गज फलंदाजांचा विक्रम मोडीत काढला.सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या गुरबाज याने आयर्लंडविरुद्ध १२७ चेंडून १२७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने आठ चौकार आणि नऊ षटकार खेचले. या खेळीसोबतच गुरबाज हा अफगाणिस्तानकडून एकदिवसीय क्रिकेटमधील पदार्पणात सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला. त्याच्या या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने ५० षटकात ९ बाद २८७ धावा फटकावल्या.या खेळीदरम्यान गुरबाज याने पर्दापर्णात मोठी खेळी करण्याच्या बाबतीत अनेक दिग्गजांना मागे टाकले. त्याने फटकावलेल्या १२७ धावा ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये कुठल्याही फलंदाजाने पदार्पणात केलेली दुसरी सर्वात मोठी खेळी ठरली आहे. यादरम्यान, त्याने मार्क चॅपमेन, मार्टिन गप्टिल, कॉलिन इन्ग्राम, अँडी फ्लॉवर यांच्यासारख्या दिग्गजांना मागे टाकले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणात सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेन्स यांच्या नावे आहे. त्यांनी पदार्पणातच १४८ धावांची खेळी केली होती.एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणात मोठी खेळी करणारे फलंदाज१ - १४८ धावा, डेसमंड हेन्स२ - १२७ धावा, रहमानतुल्लाह गुरबाज३) - १२४ धावा, मार्क चॅपमेन४) -१२४ धावा, कॉलिन इन्ग्राम५) -१२२ धावा, मार्टिन गप्टिल६) - ११५ धावा, अँडी फ्लॉव्हर

टॅग्स :आंतरराष्ट्रीय क्रिकेटअफगाणिस्तानआयर्लंड