Join us  

आयपीएल आयोजनासाठी ईसीबीला मिळाले स्वीकृतीपत्र

दुबई : यंदा आयपीएलचे आयोजन यूएईमध्ये करण्यासाठी बीसीसीआयने एमिरेटस् क्रिकेट बोर्डाला (ईसीबी) एक स्वीकृतीपत्र पाठवले आहे. बीसीसीआय अध्यक्ष ब्रिजेश ...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 4:39 AM

Open in App

दुबई : यंदा आयपीएलचे आयोजन यूएईमध्ये करण्यासाठी बीसीसीआयने एमिरेटस् क्रिकेट बोर्डाला (ईसीबी) एक स्वीकृतीपत्र पाठवले आहे. बीसीसीआय अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी रविवारी स्वीकृतीपत्र पाठवल्याचे वृत्त खलिज टाइम्सने दिले. दुसरीकडे ईसीबीनेदेखील हे पत्र मिळाल्याचे सोमवारी सांगितले.१९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत ५१ दिवस आयपीएलचे जवळपास ६० सामने रंगणार आहेत. तथापि आयोजनाला भारत सरकारने अद्याप परवानगी बहाल केली नाही.कोरोनामुळे आठ संघांचा सहभाग असलेल्या आयपीएलचे आयोजन विदेशी भूमीत करण्यासाठी अनेक अडचणी आहेत. व्यवस्थापन हे सर्वांत मोठे आव्हान असले तरी आयोजनामुळे यूएईतील अर्थव्यवस्था बळकट होईल, यात शंका नाही. ‘जगातील सर्वांत रोमहर्षक, लोकप्रिय आणि आकर्षक लीगमुळे अनेक गोष्टींचा लाभ होईल, अशी आशा उस्मानी यांनी व्यक्त केली.’ ते म्हणाले, ‘येथे अनेकजण येणार आहेत, आयपीएल आयोजनाच्या सर्व पैलूंवर विचार करण्यासाठी तज्ज्ञांची सेवा घेण्याची गरज आहे. अबुधाबी, दुबई आणि शारजा क्रीडा परिषद, पर्यटन विभाग आणि पोलीस तसेच आरोग्य यंत्रणांसाठी शासकीय मान्यता घ्यावी लागेल.’ अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजनांचा आमच्या शासकीय यंत्रणांना अनुभव आहे. बीसीसीआयने आपल्या गरजा आम्हाला सांगाव्यात. आम्ही प्रत्येक गोष्टींवर सरकारची मदत घेत आयपीएल यशस्वी करण्यासाठी सहकार्यास तयार आहोत.कोरोनाचे दिशानिर्देश तयार केल्यानंतर प्रत्यक्ष मैदानात कुठली उपाययोजना करायची त्याचाही विचार केला आहे. आमच्या सरकारने सुरक्षेच्या प्रत्येक गोष्टीची हमी दिली आहे,’असे उस्मानी यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)एमिरेटस् क्रिकेट बोर्डाचे महासचिव मुबश्शिर उस्मानी यांनी दिलेल्या माहितीनुसार ,‘आम्हाला अधिकृत पत्र मिळाले. आता भारत सरकारच्या परवानगीनंतर उभय बोर्डात अंतिम करार होईल. परवानगी मिळेपर्यंत दोन्ही बोर्डांनी काम सुरू केले आहे. सुरक्षित वातावरणात आयोजनासाठी तयारीला वेग देण्यात आला आहे.’

टॅग्स :आयपीएल 2020