Corona Virusचा खेळाडूंना मोठा झटका; क्रिकेट मंडळानं रद्द केले करार

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 01:12 PM2020-05-05T13:12:28+5:302020-05-05T13:13:35+5:30

whatsapp join usJoin us
ECB Cancels Contracts Of Players Signed Up For 'The Hundred' svg | Corona Virusचा खेळाडूंना मोठा झटका; क्रिकेट मंडळानं रद्द केले करार

Corona Virusचा खेळाडूंना मोठा झटका; क्रिकेट मंडळानं रद्द केले करार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या. कोरोना व्हायरसचा जगभरात वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा होणारी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आली. कोरोना व्हायरसमुळे यंदापासून सुरू होणारी The Hundred क्रिकेट लीग पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळानं ( ECB) या लीगसाठी करारबद्ध केलेल्या खेळाडूंचा करार रद्द केला. 

17 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत ही स्पर्धा होणार होती, परंतु कोरोना व्हायरसमुळे ही 2021पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 8 संघाचा समावेश असलेल्या लीगमध्ये प्रत्येक सामना 100-100 चेंडूंचा खेळवण्यात येणार आहे. या लीगसाठी संघ निवड करण्यात आली होती. आता ही स्पर्धाच स्थगित झाल्यामुळे ECBनं खेळाडूंना पत्र पाठवलं आहे आणि त्यात खेळाडूंचा करार रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहे. ''खेळाडूंचा करार रद्द केल्याचे पत्र आज सर्वांना पाठवले आहे. ही लीग पुढे ढकलल्यानंतर कायदेशीर बाब म्हणून हा करार रद्द केला गेला आहे.''

ट्वेंटी-20 लीगच्या धर्तीवर यंदापासून नव्यानं सुरू होणाऱ्या 'The Hundred' लीग रद्द करण्याचा निर्णय इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं ( ECB) नुकताच घेतला.  कोरोना व्हायरसमुळे यंदा ही लीग खेळवणे शक्य नसल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. परदेशी खेळाडूंवरील प्रवास बंदीमुळे या लीगमध्ये खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या सहभाग होणे अश्यक्य आहे. ECB चे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरीसन यांनी सांगितले की,''सद्य परिस्थिती लक्षात घेता यंदा The Hundred लीग होणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही निराश आहोत, परंतु ही लीग 2021मध्ये खेळवण्यात येईल.''

Handwara Militant Attack: जवाब जरूर मिलेगा; बबिता फोगाटचा दहशतवाद्यांना इशारा 

1992 नंतर पाकिस्तान वर्ल्ड कप जिंकू नये, ही तर Wasim Akramची इच्छा; माजी कर्णधाराची टीका 

2011चा वर्ल्ड कप 'या' खेळाडूमुळे जिंकलो; Suresh Rainaचा मास्टर स्ट्रोक

Corona Virus : 7 वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलाला WWE स्टार जॉन सीनानं दिलं सरप्राईज

वर्ल्ड कपनंतर MS Dhoni लाच क्रिकेटपासून दूर रहायचं होतं; माजी निवड समिती प्रमुखाचा दावा

Web Title: ECB Cancels Contracts Of Players Signed Up For 'The Hundred' svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.