Join us  

कोहली, धोनी अन् आशिया DJ Bravoचं नवं गाणं, पाहा व्हिडीओ..

चॅम्पियन... चॅम्पियन, या गाण्यानं DJ क्षेत्रात दमदार एन्ट्री करणाऱ्या ड्वॅन ब्राव्होचं नवं गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 10:10 AM

Open in App

कॅनबेरा : चॅम्पियन... चॅम्पियन, या गाण्यानं DJ क्षेत्रात दमदार एन्ट्री करणाऱ्या ड्वॅन ब्राव्होचं नवं गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. DJ Bravo या नावानं प्रसिद्ध झालेल्या वेस्ट इंडिजच्या या अष्टपैलू खेळाडूने नव्या गाण्यात आशिया खंडातील क्रिकेट संघांचे कौतुक केले आहे. त्यानं गाण्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघाचे आणि संघातील खेळाडूंचे भरभरून कौतुक केले आहे. 

त्याच्या या गाण्यात भारताच्या विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या नावाचा उल्लेख विशेष ठरला. त्यांच्यासह शाहिद आफ्रिदी, शकीब अल हसन, रशीद खान, महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांचेही नाव आले. पाकिस्तानच्या आफ्रिदीनं DJ Bravo चे हे नवीन गाणे शेअर केले.  ऑक्टोबर 2018 मध्ये ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, परंतु ते व्यावसायिक ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळणार आहे. ब्राव्होने कसोटी क्रिकेटमध्ये 2200 धावा आणि 86 विकेट्स घेतल्या आहेत. त्यात तीन शतकांचा समावेश आहे. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 2986 धावा आणि 199 विकेट्स आहेत.  

पाहा व्हिडीओ..."Well @DJBravo47, this is definitely an improvement on the Champion’ song, especially since you’ve included me in the lineup. Wishing you all the very best with this new number, & I hope it gets just as popular," Afridi wrote on Twitter.  

टॅग्स :ड्वेन ब्राव्होमहेंद्रसिंह धोनीविराट कोहली