Join us  

IPL 2021 : महेंद्रसिंग धोनीनं सोडला सोपा झेल; दीपक चहर झाला रिअ‍ॅक्ट, नेटिझन्स गेले भूतकाळात Video

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) बुधवारी आयपीएल २०२१त सनरायझर्स हैदराबादवर ( Sunrisers Hyderabad) ७ विकेट्स व ९ चेंडू राखून सहज विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 7:15 AM

Open in App

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) बुधवारी आयपीएल २०२१त सनरायझर्स हैदराबादवर ( Sunrisers Hyderabad) ७ विकेट्स व ९ चेंडू राखून सहज विजय मिळवला. SRHचे ३ बाद १७१ धावांचा CSKनं १८.३ षटकांत यशस्वी पाठलाग केला. चेन्नई सुपर किंग्सनं हा सामना जिंकला असला तरी महेंद्रसिंग धोनीकडून पहिल्याच षटकात एक चूक झाली. त्यानं दीपक चहरच्या गोलंदाजीवर SRHचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोचा सोपा झेल सोडला. नशीबानं हा सुटलेला झेल CSKसाठी महागात पडला नाही. धोनीनं झेल सोडताच दीपक चहर रिअ‍ॅक्ट झालाच, शिवाय नेटिझन्सही भूतकाळात गेले. धोनीनं असा सोपा झेल कधी सोडला, हे शोधण्यासाठी... 

पाहा व्हिडीओ... नेटिझन्सची प्रतिक्रिया...

सामन्यात नेमकं काय झालं?

कर्णधार डेव्हिड वॉर्नर ( ५७) व मनीष पांडे ( ६१) यांची १०६ धावांची भागीदारी आणि केन विलियम्सन व केदार जाधव यांच्या अखेरच्या षटकांतील फटकेबाजीच्या जोरावर हैदाराबादनं १७१ धावांचा डोंगर उभा केला. केन १० चेंडूंत २६ आणि केदार जाधव ४ चेंडूंत १२ धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरात फॅफ ड्यू प्लेसिस ( ५६) व ऋतुराज गायकवाड ( ७५) यांनी पहिल्या विकेटसाठी १२९ धावा जोडल्या. रवींद्र जडेजा व सुरेश रैना यांनी CSKचा विजय पक्का केला.  हैदराबादकडून राशिद खाननं ३६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. चेन्नईनं १८.३ षटकांत ७ विकेट्स राखून विजयी लक्ष्य पार केले.  

टॅग्स :आयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्ससनरायझर्स हैदराबाद