Join us  

‘द. आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत आत्मसंतुष्ट राहू नका’

मालिकेत १-० अशी आघाडी घेणाऱ्या पाकिस्तान संघाने याच आठवड्यात द. आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आत्मसंतुष्ट राहण्याचा फाजीलपणा करू नये, असा मोलाचा सल्ला मुख्य कोच मिस्बाह उल हक यांनी खेळाडूंना सोमवारी दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 2:11 AM

Open in App

रावळपिंडी : मालिकेत १-० अशी आघाडी घेणाऱ्या पाकिस्तान संघाने याच आठवड्यात द. आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आत्मसंतुष्ट राहण्याचा फाजीलपणा करू नये, असा मोलाचा सल्ला मुख्य कोच मिस्बाह उल हक यांनी खेळाडूंना सोमवारी दिला. यजमान संघाने कराची येथे पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात २७ धावात चार फलंदाज गमावल्यानंतरही पाहुण्या संघावर सात गडी राखून विजय मिळविला होता. दुसरा सामना गुरुवारपासून येथे सुरू होणार आहे. यासिरशाह आणि पदार्पण करणारा ३४ वर्षांचा डावखुरा फरकी गोलंदाज नौमान अली यांनी पहिल्या सामन्यात १४ गडी बाद केले होते. मिस्बाह म्हणाले, ‘या विजयाची फार गरज होती. संघाने कठीण परिस्थितीवर मात करीत विजय साजरा केला. तथापि खेळाडूंनी आत्मसंतुष्ट होऊ नये. द. आफ्रिका संघ बलाढ्य असून तो मुसंडी मारू शकतो, याची जाणीव असू द्या.’मिस्बाह तसेच गोलंदाजी कोच वकार युनूस यांना न्यूझीलंडकडून ०-२ ने मालिका गमावल्यानंतर पीसीबीने पाचारण केले होते. दोघांना आणखी एक संधी देण्यात आली होती. या दोघांचे भविष्य द. आफ्रिकेविरुद्ध निर्भेळ यशावर विसंबून असेल. मिस्बाह म्हणाले, ‘विजय मिळविण्यासाठी आम्ही सर्व ऊर्जा पणाला लावणार आहोत.’ 

टॅग्स :मिसबा-उल-हकपाकिस्तान