Join us  

पंतप्रधान सहाय्यता निधीत मदत करण्यापूर्वी, जरा आजूबाजूला पाहा; एस श्रीसंतचा लाखमोलाचा सल्ला!

भारताचा आणि केरळचा गोलंदाज एस श्रीसंत ( S Sreesanth) यानं देशातील नागरिकांना विनंती केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 5:11 PM

Open in App

भारताचा आणि केरळचा गोलंदाज एस श्रीसंत ( S Sreesanth) यानं देशातील नागरिकांना विनंती केली आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि मागील 24 तासांत 4 लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. या काळात अनेक जण मदतीचा हात पुढे करत आहेत. अनेक क्रिकेटपटू, बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्री, उद्योगपती आदींनी मुख्यमंत्री व पंतप्रधान सहाय्यता निधीत मदत केली. पण, एस श्रीसंतचं म्हणणं काही वेगळंच आहे आणि त्याची विनंती पटण्यासारखीही आहे. 

कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी श्रीसंतही मैदानावर उतरला आहे आणि त्यानं जनजागृती केली आहे. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट करून त्याच्या फॅन्स व मित्र परिवारांना कळकळीची विनंती केली आहे. 2011 व 2007 च्या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा सदस्य असलेल्या श्रीसंतनं पोस्ट लिहिली की,''मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान सहाय्यता निधीत मदत करण्यापूर्वी, जरा आजुबाजूला पाहा. तुमच्या नातेवाईकाला, मित्राला किंवा तुमच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक मदतीची गरज असेल. पहिलं त्यांना कणखर करा. कारण, तुम्हीच त्यांच्यापर्यंत पोहचू शकता, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाही.''

 ३.६ कोटी, तेही २४ तासांहून कमी कालावधीत; विराट कोहली-अनुष्का शर्मा यांच्या कोरोना लढ्याला मोठं यश!विराट कोहली ( Virat Kohli) व अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांनी कोरोना लढ्यात सहभाग घेण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ७ कोटींचा निधी जमा करण्याचे लक्ष्य विरुष्कानं डोळ्यासमोर ठेवले आहे आणि २४ तासांहून कमी कालावधीत त्यांनी ३.६ कोटी रक्कम जमाही केली आहे. यातील २ कोटी रक्कम ही विराट-अनुष्का यांनी दान केली आहे. या मोहिमेला मिळलाले प्रतिसाद पाहून विराट व अनुष्का यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. निम्मा पल्ला पार केला आहे आणि आपलं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया, अशी पोस्ट दोघांनी लिहीली आहे.  

टॅग्स :श्रीसंतकोरोना वायरस बातम्या