Join us  

जेम्स अ‍ॅन्डरसनवर वर्चस्व गाजवा; ग्लेन मॅक्ग्राचा टीम इंडियाला सल्ला

ग्लेन मॅक्ग्राने दिला विजयाचा कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 1:55 AM

Open in App

चेन्नई : इंग्लंड दौऱ्यात मालिका विजयाची शक्यता बळकट करायची झाल्यास विराट अ‍ॅन्ड कंपनीने प्रतिस्पर्धी गोलंदाज जेम्स अ‍ॅन्डरसनच्या गोलंदाजीवर वर्चस्व गाजवावे. त्याचे वेगवान आणि हवेत वळण घेणारे चेंडू अलगद टोलवायला हवेत, असा सल्ला आॅस्ट्रेलियाचा माजी दिग्गज ग्लेन मॅक्ग्रा याने भारतीय खेळाडूंना दिला.पत्रकारांशी बोलताना मॅक्ग्रा म्हणाला ‘भारतीय फलंदाज इंग्लंडच्या परिस्थितीचा सामना कसा करतात, हे देखील महत्त्वाचे ठरेल. अ‍ॅन्डरसनचे हवेत वळण घेणारे वेगवान चेंडू खेळताना फलंदाज हावी झाल्यास भारताला मालिका विजय मिळविणे कठीण जाणार नाही. भारताने अलीकडे गोलंदाजीत देदिप्यमान यश मिळविले असले तरी आगामी मालिकेत फलंदाजी हेच भारतीयांचे मुख्य शस्त्र असेल.’भारताने इंग्लंड दौऱ्यात वन डे आणि टी-२० मध्ये चांगली सुरुवात केली हे शुभसंकेत आहेत. फलंदाजी हीच भारताची भक्कम बाजू असल्याने धावडोंगर उभारावा लागणार आहे. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार हे जखमी असल्याने भारताची गोलंदाजी लाईनअप अशी असेल हे पाहणे रंजक ठरणार आहे. भारताच्या फिरकीपटूंनी अुधिक गडी बाद केले आहेत. ते या दौºयातही प्रभावी ठरतील, पण इंग्लंडमध्ये वेगवान माºयाचे यश महत्त्वाचे ठरणार असल्याचे मॅक्ग्राचे मत आहे.भारताला मालिका विजय मिळवायचा झाल्यास फिरकी गोलंदाजांना देखील वर्चस्व गाजविणे गरजेचे आहे. आमच्यावेळी शेन वॉर्न इंग्लंडमध्ये वर्चस्व गाजवायचा. खेळपट्टी अधिक जलद असेल तर चेंडू लवकर वळण घेतील, असे माझे मत आहे. भुवी आणि बुमराह बाहेर असल्याने थोडी निराशा आली आहे. ईशांत शर्मा हा त्यांची पोकळी भरणार असेल तर त्यादृष्टीने पहिली कसोटी निर्णायक ठरणार आहे. ईशांतकडे आधीसारखीच विकेट घेण्याची त्याच्यात क्षमता आहे का, हे देखील पहावे लागेल. उमेश यादवच्या चेंडूत देखील अधिक वेग असल्यामुळे भारताला त्याची गरज भासेल, असे मत त्याने व्यक्त केले. (वृत्तसंस्था)भारताचा कर्णधार विराट कोहलीने प्रत्येक ठिकाणी चांगली कामगिरी केली आहे. आता इंग्लंडमधील आपला इतिहास बदलण्यासाठी विराट प्रयत्नशील असेल. कोहलीच्या भात्यात सर्व प्रकारचे फटके आहेत. मैदानावर विराट नेहमीच व्यक्त होतो. भावना दडवून ठेवण्याचा त्याचा स्वभाव नाही. इंग्लिश वातावरणातही आपण धावा करु शकतो हे विराटला आता दाखवून द्यावे लागले. इंग्लिश वातावरणात चेंडूला स्विंग मिळेल.त्यामुळे विराटने त्या वातावरणाशी जुळवून घेतल्यास तो तिथे खोºयाने धावा करु शकतो.- ग्लेन मॅक्ग्रा

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटआॅस्ट्रेलिया