Join us  

सचिन आणि धोनी यांच्यामधल्या समान गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का...

पहिल्या एकदिवसीय सामन्यात सचिन शून्यावर बाद झाला होता. धोनीने 2004 साली एकदिवसीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. धोनीही यावेळी शून्यावरच बाद झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 5:21 PM

Open in App
ठळक मुद्देएकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनने 189 डावांमध्ये सात हजार धावांचा टप्पा गाठला होता.

मुंबई : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांमध्ये काही गोष्टी सारख्या आहेत. धोनीने कुठेतरी सचिनच्या पावलावर पाऊल टाकल्याचेच यामध्ये दिसत आहे. तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का...

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनने 189 डावांमध्ये सात हजार धावांचा टप्पा गाठला होता. धोनीनेही आपल्या 189 डावात 113 धावांची खेळी साकारली होती. या खेळीसह धोनीने सात हजार धावांचा पल्ला गाठला होता.

सचिनने पहिला एकदिवसीय सामना 1989 साली खेळला होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात सचिन शून्यावर बाद झाला होता. धोनीने 2004 साली एकदिवसीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. धोनीही यावेळी शून्यावरच बाद झाला होता.

भारतामध्ये आयपीएलला 2008 साली सुरुवात झाली. सचिन यावेळी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार होता, तर धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्त्व करत होता. या दोघांनीही आयपीएलमध्ये सुरुवातीचे तीन सामने जिंकले होते.

सचिनने 2010 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामना खेळताना नाबाद द्विशतक झळकावले होते. सचिनने जेव्हा हे द्विशतक झळकावले तेव्हा सचिन संघाच्या कर्णधारपदी नव्हता. त्यानंतर तीन वर्षांनी धोनीने पाकिस्तानविरुद्ध द्विशतक झळकावले होते, या द्विशतकाच्यावेळी धोनीही संघाचा कर्णधार नव्हता.

टॅग्स :सचिन तेंडुलकरमहेंद्रसिंह धोनी